सुदर्शन नगर येथे फुले दांपत्य दिवस मोठया उत्साहाणे साजरा

नागपूर  : महिलांच्या उध्दांरासाठी आपले सर्वस्व वाहून देत महात्मा जोतिराव फुले यांनी हाती घेतलेला समाजोध्दाराचा वसा तितक्याच नेटाने पुढे नेणा-या, सर्वसामान्य मुलींना शिक्षणाची संधी उपलब्ध करुन देणा-या २ जानेवारी फुले दांपत्य दिवस तसेच अग्रणी सावित्रीबाई फुले यांची ३ जानेवारी ही जयंती यानिमित्त  सुदर्शन नगर, घोडके प्राथमिक शाळा, न्यु नरसाळा रोड येथे मोठया उत्साहपूर्ण वातावरणात सौ.सुनंदा प्रदीप रायपूरे यांच्या अथक प्रयत्नाने फुले दांपत्य हा दिवस साजरा करण्यात आला.

        व्यासपिठावर कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या प्रा.माधुरीताई गायधनी, अध्यक्षा निर्मलताताई सकर्डे, आयोजक सौ. सुनंदा प्रदीप रायपूरे, अभिवक्त्या वैशाली जंगले, मंजुळाबाई रायपूरे, अशोक सकर्डे, निर्मला सकर्डे, रवी हुडे आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

        या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या क्रांतीज्योती महिला विचार मंचच्या संचालक, एम.ए (इतिहास, समाजशास्त्र) आंबेडकर थॉटस एम.फिल(इतिहास) प्रा.माधुरीताई गायधनी व सुनंदा प्रदीप रायपूरे यांनी सावित्रीबाई आणि महात्मा जोतिराव फुले यांच्या तैलचित्राला पुष्पहार अर्पण करुन विनम्र अभिवादन करुन कार्यक्रमाची सुरुवात केली.

          कार्यक्रमाच्या अध्यक्षा प्रा.माधुरीताई गायधनी हया पुढे बोलतांना म्हणाल्या मती विना निती गेली॥ निती विना गती गेली। गती विना वित्त गेले।। वित्त विना शुद्र खचले।

स्वातंत्र्यपूर्व  शंभर वर्षापूर्वीचा काळ हा सामाजिक रुढी परंपरांचा काळ होता. महिलांचे शिक्षण हे त्या काळी वर्ज्य होते. त्या काळात सर्वांना शिक्षणाचे महत्व पटवून देत विशेषत: महिलांना शिक्षण घेण्यासाठी प्रवृत्त करण्याचे कठीण कार्य जोतिराव व सावित्रीबाई फुले या दांपत्यांनी केले. सावित्रीबाईंनी स्वत: शिक्षण घेऊन महिलांसाठी शिक्षीकेचे काम केले. त्यांच्या या अनन्यसाधारण कार्यामुळेच त्यांना महिला शिक्षणाचे प्रवर्तक मानले जाते. जोतिबा फुले यांच्या मदतीने त्यांना सतत पुढे जाण्याकरीता प्रेरणा मिळत होती, हे त्यांचे फक्त पती नव्हते तर एक चांगले गुरु व संरक्षक देखील होते. सावित्रीबाई यानी शिक्षीकेचे व्रत अंगीकारुन पतीच्या कार्यात पूर्ण सहकार्य दिले. त्यांच्या या योगदानामुळे महिला शिक्षणाची महाराष्ट्रातील अग्रणी म्हणून सावित्रीबाई नांव नेहमीच आदराने घेतले जाते. त्या काळात महिलांना शिक्षणाची परवानगी नव्हती. यासाठी सावित्रीबाईंनी खूप संघर्ष केला आणि या रुढीला तोडण्यासाठी पती जोतिबांच्या साहायाने १ जानेवारी १८४८ पासून शिक्षणाचे माहेर घर असे ज्याला आज आपण म्हणतो त्या पुण्याच्या भिडेवाडा येथे पहिली मुलींची शाळा सुरु केली. सनातनी आणी कर्मठ समाजाचा विरोधाला न जुमानता विवाहानंतर शिक्षण घेतले आणी शिक्षक, मुख्याध्यापक बनून शिक्षण दिले. सावित्रीबाईंच्या सुधारणावादी प्रयत्नांना सनातन्यांनी विरोधकरीत त्यांच्या अंगावर शेण फेकले. काही उन्मतांनी तर अंगावर हात टाकण्याची भाषा केली. अनेक आघात होऊनही सावित्री डगमगल्या नाहीत. बाला-जरठ विवाह प्रथेमुळे अनेक मुली वयाच्या बारा-तेराव्या वर्षी विधवा व्हायच्या. ब्राम्हण समाजात विधवा पुनर्विवाह अ जिबात मान्य नव्हता. पतीच्या निधनानंतर अशा विधवांना सती जावे लागे किंवा मग कुणातरी नराधमाच्या शिकार बनत. जोतिरावांनी बालहत्या प्रतिबंधक गृह सुरु केले. सावित्रीबाईंनी ते समर्थपणे चालवले. सत्यशोधक समाजाच्या कार्यातही  सावित्रीबाईंचा मोठा सहभाग असे. प्रत्येकाच्या घरामध्ये जाऊन शिक्षणाचे धडे सागणारे हे दांपत्य या भारतामध्ये निर्माण करणारे हे दांपत्य बोधीसत्व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांमुळे आपण सन्माने उभे आहोत या कार्यक्रमामुळे सर्व महिला यांनी ज्योतीबांची प्रेरणा घेवून हा कार्यक्रम घडविला.

          सौ.सुनंदा रायपूरे यांनी एका सुंदर गीताने कार्यक्रमाची सांगता केली.

        यावेळी वर्षा गणवीर, मोहिनी हुडे, शताब्दी राकेश चाहांदे, सुबोध गाणार, करिश्मा सुबोध गाणार, आशिष गणविर यांच्यासह सुदर्शन नगर मधील बहुसंख्य नागरिक उपस्थित होते.

        कार्यक्रमाचे संचालन यश मनोज गोहणे यांनी केले तर आभार पल्लवी सकर्डे यांनी मानले

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

News Today 24x7

Next Post

कड़वी चौक निकट डैम ? 

Mon Jan 3 , 2022
 – यह एक विवादास्पद बिल्डर ने व्यवसायिक सह रहवासी संकुल के लिए खोदा, जहां जमा पानी आसपास के रहवासियों के स्वास्थ्य को नुकसान पहुंचा रहा नागपुर – कोरोना सह अन्य बीमारियों ने पुनः शहर में पांव फैलाना शुरू कर दिया।ऐसे में जमा पानी स्वास्थ्य के लिए खतरा,बावजूद इसके मनपा प्रशासन सो रहा।  कड़वी चौक स्थित फ्लाईओवर के निकट एक बिल्डर […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com