– कॅमे-यांत कैद केले बोलके प्रसंग
यवतमाळ :- नवीन फोटोग्राफर ना प्रोत्साहन देण्या साठी यवतमाळ मधे पहिल्यांदा मोफत स्ट्रीट फोटोग्राफी प्रैक्टिकल व फोटोवॉक घेण्यात आला. हा कार्यक्रम १० ऑगस्ट रोजी पोस्टल ग्राउंडवर पार पडला. यावेळी शहरातील फोटोग्राफर यांनी सहभाग नोंदवुन आपली कला सादर केली.
फोटोग्राफीचा छंद जोपासणाऱ्या लोकांना समर्पित 19 ऑगस्ट रोजी जागतिक फोटोग्राफी दिन साजरा केला जातो. एक फोटोग्राफर ,आपल्या कॅमेरात आपल्या आठवणी साठवून ठेवतो. पूर्वीच्या काळी कॅमेरे नसायचे. ग्रामीण भागातील लोकांना गावापासून दूरवर फोटो काढण्यासाठी जावे लागायचे. आता तर सगळ्यांकडे कॅमेरा आणि मोबाईल आहे. फोटोग्राफी चा छंद जोपासणारे फोटो काढण्यासाठी कुठे ही जातात. त्यामुळे नवीन फोटोग्राफरला प्रोत्साहन देण्यासाठी सनी कापसीकर, रोहित गायकवाड, उज्वल कांबळे, मोंटी मोहन व तज्ञ फोटोग्राफर यांनी पुढाकार घेवून १० ऑगस्ट रोजी यवतमाळ येथे फोटोवॉक घेण्यात आला.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून विनय मालिया, शंतनू अलोने, अंकुश जिचकार, लोकेश मुर्खे उपस्थित होते. यावेळी फोटोग्राफी बद्दल रुची ठेवणाऱ्यानी खूप चांगला प्रदिसाद देवून सगळ्यांनी आपल्या दृष्टिकोनानी कला सादर केली. फोटोवॉक करण्यासाठी समता मैदान पासून मेन लाइन ते दत्त चौक अशी ७ किलोमीटर ची फेरी काढण्यात आली. यात सहभागी झालेल्या नव फोटोग्राफरला सगळ्या ठिकाणी थांबून गाइड करण्यात आले. त्यांचा येणाऱ्या प्रवासात हा फोटोवॉक फायद्याचा ठरेल असे फोटोग्राफर सनि कापशिकार यांनी सांगितले. यावेळी फोटोवॉक मध्ये सहभागी झालेल्या २० ते २५ लोकांनी उत्तम कला दर्शवली. ज्याच्याकडे कैमरा नव्हता त्यांनी मोबाईल मध्ये फोटो सुट करुन कला सादर केली.