कामठी ता प्र 21:- कामठी नगर परिषद च्या निवडणुका तोंडावर आहेत अद्याप निवडणूक संदर्भात कुठल्याही सूचना आलेल्या नाही .प्रभाग रचना आराखडा निवडणूक आयोगाकडे सादर करण्यात आला असून प्रभाग रचना कधी जाहीर होणार याकडे समस्त राजकीय पक्षांचे लक्ष लागले असले तरी कामठी नगर परिषद निवडणुकीच्या रिंगणात उतरणाऱ्या बहुतांश पुढारी मागील पाच वर्षं प्रभागात फिरकल्याचे दिसून आले नाही परंतु लवकरच निवडणूक जाहीर होण्याची शक्यता असल्याने इच्छुक उमेदवार जनसामान्यात मिसळताना दिसत आहेत .निवडणूक आयोगाने अद्याप पावेतो नगर परिषद निवडणूक संदर्भात कुठल्याही प्रकारचो माहिती प्रसिद्ध केली नाही हे इथं विशेष!
शहरातील प्रभाग रचना निवडणूक आयोगाकडे सादर करण्यात आली असून निवडणुकीचे पडघम वाजण्याची शक्यता निर्माण झाली आहे त्यामुळे 5 वर्षे शांत असलेल्या पुढाऱ्यांनी आपला मोर्चा नागरिकांच्या प्रत्येक सुख दुःखाच्या क्षणाकडे वळविला आहे.मात्र येथील जागरूक मतदार हा विद्यमान नगरसेवकांचा मागील पाच वर्षांचा हिशोब घेणार आहे.
बॉक्स:-प्रभाग क्र 14 येथे भाजप बरीएम युतीचे उमेदवार मागिल निवडणूक रिंगणात विजयी झाले या दोन्ही नगरसेवकांनी प्रभागात खूप विकासकामे केल्याचा गाजावाजा केला मात्र या विकासाचा झंझावात करण्यात पंचवार्षिक कार्यकाळ लोटून नगरसेवक पदाचा पंचवार्षिक कार्यकाळ ही संपुन गेला मात्र रस्त्याच्या मधोमध पडलेला हा बोगदा अजूनही दुरुस्त करण्यात आला नाही या खड्ड्यात कित्येक जण पडून किरकोळ जख्मि झाले तरी सुद्धा प्रशासन तसेच नगरसेवकांनी गंभीर्याची भूमिका घेतली नाही तेव्हा हा खड्डा कुणाच्या जीवावर बेततो याची तर वाट बघत नव्हते ना, वा कुणाची बळी जाईल तेव्हा हा खद्दा दुरुस्त होणार असा सवाल येथील जागरूक नागरिक करीत असून प्रकारच्या कित्येक रखडलेल्या कामाची मतदाराकडून विचारपूस होणार आहे व मागील पाच वर्षांचा हिशोब सुदधा होणार आहे