थकीत मालमत्ता कर भरा, अन्यथा मालमत्तेवर जप्तीची कारवाई

– मनपातर्फे मालमत्ता धारकांना जाहीर आवाहन

नागपूर :- थकीत मालमत्ता कर संकलनासाठी नागपूर महानगपालिकेतर्फे कठोर पावले उचलली जात आहेत. मनपाच्या हनुमान नगर झोन मौजा हुडकेश्वर (बु.) क्षेत्रातील मालमत्ता धारकांना थकीत मालमत्ता कर त्वरित भरण्याचे आवाहन करण्यात आले आहे. कराचा भरणा न केल्यास संबंधित मालमत्तेवर जप्तीची कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती हनुमान नगर झोनचे सहायक आयुक्त पुष्पगंधा भगत यांनी दिली आहे.

हनुमान नगर झोनचे सहायक आयुक्त पुष्पगंधा भगत यांनी सांगितले की, हनुमान नगर झोन कार्यालयाच्या नियंत्रणातील कर निर्धारण वार्ड क्र. ७६ मौजा हुडकेश्वर (बु.) या परिसरातील शेवंता सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादित, सुविकास गृहनिर्माण सहकारी संस्था मर्यादित, मे. गंगोत्री डेव्हलपर्स यांच्या मिळकतीवरील मालमत्ता कर थकबाकी कर वसूल मौक्यावरील सुचना फलकावर मालमत्ता कर देयके चष्मा करुन दिनांक १७/११/२०२३ रोजी जाहीर प्रसिध्द करण्यात आले आहे.

त्यानुसार सदर मिळकतीचे मिळकतदार / सोसायटी मालक यांना वर्तमानपत्रात जाहिरात प्रसिध्द झाल्याचे दिनांकापासून १५ दिवसाचे आत मालमत्ता कराचा भरणा झोन कार्यालयात करावा अन्यथा स्थावर / जंगम मालमत्तेचा ताबा घेवून मालमत्ता जप्त करुन मालमत्ता विक्रीची कार्यवाही करण्यात येईल, याची संबंधीत मिळकतदारांनी नोंद घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.

थकीत मालमत्ता कर असलेल्या सोसायटी व खासरा क्रमांक व थकीत रक्कम

१)-वार्ड क्रमांक : ७६- खसरा क्रमांक: ९६/१ पार्ट- सोसायटी: शेवंता सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादित

– प्लॉट क्रमांक: १, २, ६ ते १०, १२, १३, १६ ते १९, २४ ते ३०, ३१ ते ४०, ४१ ते ५०, ५१ ते ६० व ६१ ते ६७. – थकीत रक्कम: २१,९१,०३०

२)-वार्ड क्रमांक : ७६- खसरा क्रमांक: ९५/२- सोसायटी: सुविकास गृहनिर्माण सहकारी संस्था मर्या,

– वर्ष : २०१३ ते २०२४ पर्यंत- प्लॉट क्रमांक: २ ते ४, ६ ते ९, १२, १५, १६, १९ ते ३२, ३३ ते ३८, ४०, ४२ ते ४६, ४९, ५२ ते ५७, ६०, ६१, ६३, ६६, ६७. ६९ ते ७३, ७५, ७६, ७८ ते ८१, ८३ ते ८६ व ८८

– थकीत रक्कम: १४,६२,७९०

३)- वार्ड क्रमांक : ७६खसरा क्रमांक: ९२ व ९३ – सोसायटी: मे. गंगोत्री डेव्हलपर्स- वर्ष : २०१६ ते २०२४ पर्यंत प्लॉट क्रमांक: १ ते १०४ –

थकीत रक्कम: ८,९८,९७२

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

विकसित भारत यात्रेतून शेवटच्या घटकापर्यंत योजना पोहचवा - खासदार सुनील मेंढे

Sat Nov 25 , 2023
· जिल्ह्यात विकसीत भारत संकल्प यात्रेची सुरवात · खासदार सुनील मेंढे यांनी दाखविली हिरवी झेंडी भंडारा :- केंद्र सरकारच्या महत्वाकांक्षी 17 योजनांची माहिती तसेच योजनांचा लाभ लाभार्थ्यांपर्यंत पोहचविण्याच्या अनुषंगाने 15 नोव्हेंबर 2023 ते 26 जानेवारी 2024 या कालावधीत ‘विकसीत भारत संकल्प यात्रा’ मोहीम राबविण्यात येणार आहे. जिल्ह्यात आज (दि.24) या यात्रेचा शुभारंभ करण्यात आला. खासदार सुनील मेंढे, जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर, […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com