संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
-लॉकडाऊन दरम्यान बंद झालेल्या लोकल रेल्वेगाड्या पूर्ववत सूरु करण्यासाठी युवक कांग्रेसचे निवेदन
कामठी ता प्र 13:-कोरोना संकटानंतर रेल्वे गाड्या बंद करण्यात आल्या होत्या.कोरोनाचे संकट ओसरल्यामुळे केंद्र तसेच राज्य सरकारने निर्बंध उठविले आहेत त्यामुळे आता रेल्वे गाडया सूरु झाल्या आहेत यातील कामठी रेल्वे स्थानक मार्गावरून रायपूर लोकल, तिरोडी लोकल, गोंदिया लोकल तसेच चक्रधरपूर लोकल अजूनपावेतो धावत नसल्याने सर्वसामान्य नागरिकांना प्रवास करणे कठीण होत आहे.विशेष म्हणजे लहान मोठ्या व्यावसायिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.तेव्हा पूर्ववत धावणाऱ्या सदर लोकल रेल्वे गाड्या सुरू करण्यात याव्या या मागण्यासाठी माजी जी प अध्यक्ष सुरेश भोयर यांच्या आदेशान्वये आज युवक कांग्रेस च्या वतीने महाराष्ट्र प्रदेश युवक कांग्रेस चे माजी महासचिव इर्शाद शेख यांच्या नेतृत्वात तहसीलदार मार्फत केंद्रिय रेल्वेमंत्री ला सामूहिक निवेदन सादर करण्यात आले.
याप्रसंगी क्षमठिब नगर काँग्रेस कमेटी चे अध्यक्ष कृष्णा यादव , महाराष्ट्र प्रदेश सेवादल चे सहसचिव गेडाम , विष्णु चनोले , सोहेल अंजुम , सुरैया बानो, अंबिका रामटेके, ज्योति कारेमोरे,मंजु ताई मेश्राम, माजी नगरसेवक मो.अरशद कमाल,मो.राशिद अंसारी, तौसीफ मलिक फैजी,मो.सलमान खान, इरफान अहमद,अफसर खान, सुलतान अशरफी,दिवाकर राव सौदागर, रिजवान शेख, आशीष मेश्राम,फरमान खान, अरशद खान,सोहेब खान, प्रमुखताने उपस्थित होते .
रेल्वे लोकल बंद चा प्रवाशांना फटका
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com