– गुजरात राज्याचे राज्यपाल व कृषीमंत्री राहणार उपस्थित
नागपूर :- शेतकरी आणि कृषी पत्रकारांचे नाते अधिक दृढ करण्यासाठी राष्ट्रीय कृषी पत्रकार संघ (अनाज-इंडिया) तर्फे मागील ५ वर्षांपासून गांधीनगर, गुजरात येथे राष्ट्रीय कृषी पत्रपरिषदेचे आयोजन करण्यात येत आहे. यावर्षीही पाचव्या राष्ट्रीय कृषी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले असून या परिषदेसाठी कृषी पत्रकारितेच्या क्षेत्रात गेली अनेक वर्षे अविरतपणे कार्यरत असलेल्या दोनशेहून अधिक अनुभवी कृषी पत्रकारांसह देशभरातील कृषी शास्त्रज्ञ, तज्ज्ञ, प्रगतीशील शेतकरी, कृषी उद्योजक, कृषी कामगार यांचा सहभाग असणार आहे. आजच्या आधुनिक काळातही कृषी पत्रकारितेला महत्त्व असून कृषी पत्रकारितेच्या माध्यमातून जमीनीची सुधारणा करता येणे, जमिनीची उत्पादकता वाढविने, तसेच शेतकऱ्यांचे व देशाचे उत्पनन वाढविविण्याकरिता फार मोठ्या प्रमाणावर हातभार लागतो आहे असे कृषि विस्तार कार्याच्या अभ्यासातून सिद्ध झाले आहे. म्हणूनच कृषी पत्रकारिता खऱ्या अर्थाने कृषी विकासाच्या विकसत्मक कार्यात महत्त्वाची भूमिका बजावते आहे. व ती टिकून आहे. यावर्षी पाचव्या राष्ट्रीय कृषी पत्रकार संमेलनाचे आयोजन हेलीप्याड एक्सिब्युशन सेंटर, गांधीनगर, गुजरात येथे दि.२१ सप्टेंबर २०२४ ला सायंकाळी ५.०० वाजता करण्यात आले आहे. कार्यक्रमाचे मुख्य अतिथी म्हणून गुजरात राज्याचे राज्यपाल, आचार्य देवव्रत तसेच राघव पटेल, गुजरात राज्याचे, कृषीमंत्री यांची प्रमुख उपस्थिति राहणार आहे. या संमेलनात नैसर्गिक शेती या विषयावर चर्चा घेण्यात येणार आहे तसेच महाराष्ट्र, मध्यप्रदेश, राजस्थान आणि गुजरात उत्तर प्रदेश, छत्तीसगड या राज्यातील कृषी क्षेत्रात उल्लेखनिय व महत्वपूर्ण कार्य करणारे शेतकरी, प्रगतिशील शेतकरी, कृषी संशोधक, कृषी शास्त्रज्ञ / तज्ज्ञ, कृषी उद्योजक, कृषी लेखक, मार्गदर्शक व कार्यकर्ता यांना कृषी गौरव व कृषी सेवा पुरस्कार देवून पाहूण्याच्या हस्ते सन्मानित करण्यात येणार आहे. तसेच देशपातळीवर कृषी क्षेत्रात उल्लेखनिय व भरीव कामगिरी करणाऱ्या पाच व्यक्तींना सरदार वल्लभभाई पटेल यांच्या नावाने राष्ट्रीय कृषी गौरव पुरस्कार पाहुण्यांच्या हस्ते देण्यात येणार येणार आहे. सर्व पुरस्कारांचे स्वरुप शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह व सन्मानपत्र असे राहील. प्रस्तुत कार्यक्रमाला मंचावर रेडिकल कम्युनिकेशनचे सीईओ, सन्याल देसाई, गजानन गिरोलकर, अध्यक्ष, राष्ट्रीय कृषी पत्रकार संघ व इतर पाहुणे उपस्थित राहतील. कार्यक्रमांच्या ठिकाणी दिनांक २० ते २२ सप्टेंबर २०२४ ला अँग्री एशिया या अंतरराष्ट्रीय कृषी मेळाव्याचे आयोजनही करण्यात आले आहे. त्याकरीता शेतक-यांनी कृषी विषयक तंत्रज्ञान माहिती करुन घेण्यासाठी अँग्री एशिया २०२४ या कृषी प्रदशदीला आवश्य भेट द्यावी. असे आवाहन गजानन गिरोलकर यांनी केले आहे. पुरस्कार प्राप्त मान्यवर सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय कृषी गौरवपुरस्कार- २०२४
१) डॉ. चारुदत्त दिगंबरराव मायी, अध्यक्ष इंडिया सोसायटी फॉर कॉटन इम्प्रूमेंट मुंबई, नागपूर (महाराष्ट्र)
२) देव देश प्रतिष्ठान, अध्यक्ष डॉ. वैभव देवगिरीकर, बर्वे नगर घाटकोपर पश्चिम मुंबई (महाराष्ट्र)
३) रुबी ओमप्रकाश पारिक, ग्राम खटवा ता. लालसोट जि दौसा (राजस्थान)
४) डॉ.शिवाजीराव ढोले, चेअरमन व्यंकटेश्वरा को-ऑपरेटिव्ह पॉवर अँड प्रोसेसिंग लिमिटेड नाशिक (महाराष्ट्र)
५) हमीरसिंह रघुभा परमार, केंद्र आयोजक गुजरात स्टेट को-ऑपरेटिव्ह कॉटन फेडरेशन (गुजरात)
६)चौधरी राजवीर सिंह, प्रबंध संपादक फसल क्रांती, दिल्ली उत्तर प्रदेश
राज्यस्तरीय कृषी गौरव पुरस्कार-२०२४
१) सुखदेव पांडुरंग गुर्वे ग्राम. करंभाड ता. पारशिवनी जिल्हा नागपूर
२)अरुण हनुलाल जैन, क्लासिक गगन अपार्टमेंट, हिंगणा रोड, नागपूर
३) आनंदराव शामराव कुचेकार, ग्राम. पळसोडा तालुका संग्रामपूर जिल्हा बुलढाणा (महाराष्ट्र)
४) वनराजसिंह दिलीपसिंह चौहान ग्राम. बावलिया ता. शिनोर जि. बडोदरा गुजरात
५) मोतीसिंह रावत, ग्राम. सेलमा ता.भीम जी. राजसमंद (राजस्थान)
६) सूर्य प्रकाश सिंह, ग्राम. टनडीया ता.धंदोरपुर जि. वाराणसी (उत्तर प्रदेश)
कृषि साहित्य भूषण पुरस्कार – २०२४
रंगनाथ गुलाबराव तालवटकर ग्राम चिखली ता.समुद्रपूर जि.वर्धा (महाराष्ट्र)
राज्यस्तरीय कृषी सेवा पुरस्कार-२०२४
१) कृष्ण बाजीराव पाटील संपादक, कृषी सेवक, अष्टविनायक नगर रावेर जिल्हा जळगाव (महाराष्ट्र)
२) मनोहर रंगनाथ खके, कृषी वैज्ञानिक, प्लॉट नंबर १५ कोथरूड, जिल्हा पुणे (महाराष्ट्र)
३) डॉ.विष्णुकांत सूर्यभान टेकाळे कृषी महाविद्यालय मुल जिल्हा चंद्रपूर महाराष्ट्र
४) अंबरीश कृष्णा घाटाटे संचालक आवरा पार्क औषधी व सुगंधी वनस्पती सिव्हिल लाईन नागपूर (महाराष्ट्र)
५) डॉ.चिन्मय जोशी, मुख्य प्राद्योगिकी अधिकारी, एमी ग्री बाय सायन्स आमदाबाद (गुजरात)
६) वैशाली अमोल शिर्के, संपादक कृषी भारत, अहमदाबाद (गुजरात)
७) अर्चना पटेल, व्यवस्थापकीय संचालक, कृषीटेक इंडस्ट्रीज लिमिटेड, या सनतेज, अहमदाबाद (गुजरात)
८) डॉ.उपेन्द्र सिंह तेवतिया, मुख्य प्रबंधक, इंडियन पोटॅश लि. नई दिल्ली (उत्तर प्रदेश)