– २५ जानेवारी सायकल रॅली अन् ३० रोजी स्विमॅथॉन
नागपूर :- स्वच्छ, सुंदर आणि स्वस्थ नागपूर साकारण्याच्या अनुषंगाने नागपूर महानगरपालिका व जेडी स्पोर्ट्स फाउंडेशन यांच्या विद्यमाने “स्वच्छतेतून आरोग्याकडे” उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत येत्या बुधवारी २५ जानेवारी रोजी सायकल रॅली आणि सोमवार ३० जानेवारी रोजी अंबाझरी तलाव येथे स्विमॅथॉनचे आयोजन करण्यात आले आहे. तरी खेळाडूंनी या उपक्रमात मोठ्या संख्येत सहभाग नोंदवावा असे आवाहन नागपूर महानगपालिकेतर्फे करण्यात आले आहे.
नागपूर शहरातील 100 क्रीडांगणावर “स्वच्छतेतून आरोग्याकडे’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे. त्या अनुषंगाने शहरातील 100 क्रीडांगणावरील खेळाडू, प्रशिक्षक, नागरिक यांचा या उपक्रमामध्ये सहभाग करून घेण्यात येणार आहे. याशिवाय स्वच्छतेचा संदेश देण्याकरिता वर्षभर विविध जनजागृती विषयक उपक्रमांचे नागपूर महानगरपालिका व जेडी स्पोर्ट्स फाउंडेशन यांच्या विद्यमाने आयोजन करण्यात येणार आहे.