अमरावती :- संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते यांचे सुपुत्र पार्थ मिलींद बारहाते यांची जपानमधील होक्काईडो राज्यातील सपरो येथील ए.डब्ल्यू,एल. कंपनीत इंटरशीपकरीता निवड झाली आहे.
पार्थ हा इंडियन इन्स्टिटयूट ऑफ टेक्नॉलॉजी, खरगपूर (आय.आय.टी.) येथे बी.टेक. अभ्यासक्रमाला चवथ्या वर्षाला आहे. पाच वर्षीय इंटेग्रेटेड डबल डिग्री प्रोग्राम बी.टेक. अधिक एम.टेक. (बायोटेक्नॉलॉजी) अभ्यासक्रम तो पूर्ण करीत आहे.
ए.डब्ल्यू.एल. या नामांकीत कंपनीत इंटरशीप करण्यासाठी पार्थ जपानला रवाना झाला आहे. त्याची चवथ्या व पाचव्या वर्षासाठी निवड झाली आहे. पार्थ लहानपणापासूनच कुशाग्र बुध्दीमत्तेचा आहे. त्याचे वडील संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू आहेत. तर आई डॉ. बारहाते ह्रा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या संगणकशास्त्र विभागात प्राध्यापक आहेत. पार्थ मिलींद बारहाते याचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.