संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
पारशिवनी : – पावसाळ्यात पुर परिस्थिती निर्माण होऊन जीव धोक्यात आलेल्या नागरिकांना सुखरूप बाहेर काढण्याच्या दृष्टीकोणातुन पारशिवनी तहसिल कार्यालयाच्या तालुका शोय व बचाव पथकास आपत्ती प्रतिसाद दल एनडीआरएफ व एसडीआरएफ व्दारे आज सोमवार ला नवेगाव (खैरी) येथील पेंच धरणा च्या जलाशयात आपत्ती व्यवस्थापन ची कार्यशाळेचे आयोजन करून प्रशिक्षण देऊन रंगीत तालीम घेण्यात आली.
पावसाळा पेंच प्रकल्प जलाशयातील पाण्याची पातळी वाढल्याने पेंच जलाशयाचे दरवाजे उघडुन पेंच नदी व्दारे कन्हान नदीत पाण्याचा विसर्ग करण्यात येते. त्यामुळे अनेक गावात पुरपरिस्थिती निर्माण होते. अश्यावेळी नैसर्गिक आपत्तीत सापडलेल्या नागरिकां चा जीव वाचवुन सुखरूप बाहेर काढण्याच्या दृष्टीको णातुन नागरिकांना वेळीच मदत मिळावी यासाठी केंद्र व राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या एनडीआरएफ व एसडीआरएफ जवाना व्दारे आज सोमवार (दि.३०) मे ला नवेगाव (खैरी) येथील पेंच धरणाच्या जलाशया त पारशिवनी तहसिल कार्यालयाच्या तालुका शोय व बचाव पथकांतील तहसिल कार्यालय कर्मचारी, वन कर्मचारी, कृषी विभाग, सिंचन विभाग, महसुल विभा ग, तलाठी, कोतवाल, पोलिस विभाग पोस्टे कन्हान व पारशिवनी पोलीस अधिकारी, शिपाई, पोलीस पाटील आदीना नदी पात्रात बोट चालवताना कोणते साहित्य सोबत ठेवावे. आपत्ती वेळी शोध व बचाव कार्य कसे करावे, बोट कशी हाताळावी आणि आपला व नागरि कांचा पुरापासुन कसा बचाव करावा या सर्व बाबींचे प्रशिक्षण देत मार्गदर्शन करून रंगीत तालीम घेण्यात आली. यावेळी कार्यशाळेस राज्य आपत्ती व्यवस्थापन दलाचे समदेशक, बचाव कार्य, बिनतारी संदेश कर्मचा री यांच्यासह तहसिलदार प्रशांत सांगडे, मंडळ अधि कारी जगदिरा मेश्राम, चलाठी, कोतवाल, कृर्षी विभा गचे किष्णा ठोबरे, सिंचन विभागचे अभियंता विशाल दुपारे, वन कर्मचारी सुरेश भोयर, सरपंच, पाराशिवनी व कन्हान पोलीस स्टेशनचे अधिकारी, कर्मचारी आणि पोलिस पाटील सह समाजसेवक नागरिक उपस्थित होते.
मागे सततधार पावसामुळे पुरपरिस्थिती निर्माण होऊन तोतलाडोह व पेंच धरणातील जलसा़ठा वाढ ल्याने नाईलाजास्तव पेंचचे चौदा दरवाजे उघडुन पेंच नदी व्दारे कन्हान नदीत पाण्याचा विसर्ग करण्यात आल्याने दोन्ही नदी काठावरील पारशिवनी तालुक्या तील गावांना पुराचा धोका निर्माण झाला होता. यात पेंच नदी काठावरील सालई, काळाफाटा, नयाकुंड, बखारी, पिपळा, गवना, गरंडा, नांदगाव, एंसंबा तसेच कन्हान नदीच्या काठावरील घाटरोहणा, जुनिकामठी, गाडेघाट, पिपरी, सिहोरा, खंडाळा, निलज, सिंगारदिप, बोरी-सिंगोरी अश्या अनेक गावाला पुराचा धोका निर्मा ण झाला होता. तर नांदनाव, एसंबा, घाटरोहणा, जुनि कामठी, पिपरी, सिहोरा, सिंगारदिप, बोरी गावांना बेटा चे स्वरूप आले होते. सामाजिक कार्यकर्त्यानी व तह सिल आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन पथकाने बोटीने नागरिकांना मदत करून सुरक्षित बाहेर काढुन बचाव कार्य करण्यात आले होते.