-दिनेश दमाहे ,मुख्य संपादक
नागपूर – आज दि. 20/01/2022 रोजी सकाळी 11.30 वा. चे दरम्यान गुप्त बातमीदारा मार्फत माहिती मिळाली की श्री. गणपती सुपारी सेंटर, सुरुची कंपनीचे मागे, छोटी उमीया वसाहत विभाग, कापसी खुर्द, पो.स्टे. पारडी, नागपूर शहर येथील गोदामात खराब व निकृष्ठ दर्जाची सुपारीसाठवुन ठेलेली आहे. अशा माहिती वरुन पो.स्टे. पारडीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोहर कोटनाके व पोलीस स्टॉफ यांचे सह गेले असता श्री. गणपती सुपारी सेंटर , सुरुची कंपनीचे मागे ,
छोटी उमीया वसाहत, कापसी खुर्द, पो.स्टे. पारडी, नागपूर असे गोडावुन त्यांना दिसुन आलेकंम्पनीच्या आत गेले असता तिथे काही इसम काम करतांना दिसुन आले. गोदामात आत पाहीले असता तिथे बोरी मध्ये सुपारी ठेवल्याचे दिसुन आले . सुपारीची पाहणी केली असता ते निकृष्ठ व खराब दर्जाची असल्याचे दिसुन आले.
तिथे हजर असलेले मजुरांना मालकाबाबत विचारपुस केली असता याचे मालक महेशकुमार अग्रवाल यांचे मालकीची असुन ते तिथे हजर होते. त्यांना नमुद सुपारी बाबत विचारपुस केली असता त्यांनी काहीही समाधानकारक उत्तरे दिली नाही. तसेच एकुण 353 बोरी सुपारी किंमती रू. 64,86,375/- ची सुपारीची पाहणी केली असता ते सुपारी निकृष्ठ दर्जाची खराब असल्याचे दिसुन आल्याने पुढील कारवाई करीता मा. सहायक आयुक्त(अन्न) अन्न औषधी प्रशासन,
ग्रामीण विभाग, नागपूर यांना पाचारण करून कारवाई सोपविण्यात आली.
सदरीची कारवाई नागपूर शहराचे पोलीस उप आयुक्त(परिमंडळ क्र. 5) मनिश कलवानिया व सहायक पोलीस आयुक्त(कामठी विभाग) नयना अलुरकर यांच्यामार्गदर्शनाखाली पो.स्टे. पारडी चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. मनोहर कोटनाके, पोउपनि दिपक इंगळे, सफौ. दादाराव कारेमोरे, पोहवा छगन राउत, नापोशि रूपम टेंभेकर, पोशि अहमद शेख यांनी केल.