नागपूर :- जिल्ह्यातील स्वयंरोजगार इच्छुक सुशिक्षित युवक-युवतीकरीता पंडीत दीनदयाल उपाध्याय स्वयंरोजगार मेळावा आयोजित केलेला आहे. या मेळाव्यात नागपूर जिल्ह्यातील सर्व महामंडळे तसेच शासनाचे विविध विभागाच्या वेगवेगळ्या योजनांची माहिती एका छत्राखाली उपलब्ध होण्याकरीता स्वयंरोजगार मेळावा घेण्याचे योजिले आहे.
हा मेळावा जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र नागपूर प्रशासकीय इमारत क्र. 2 मध्ये दुसरा माळा सिव्हील लाईन, नागपूर येथे 24 संप्टेंबर 2022 ला दुपारी 12.00 ते 3.00 वाजेपर्यत आयोजित केलेला आहे. सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींनी स्वयंरोजगार मेळाव्यामध्ये सहभागी होऊन स्वयंरोजगार करण्याकरीता शासनतर्फे मिळणाऱ्या विविध योजना माहिती घ्यावी.
या स्वयंरोजगार मेळाव्यामध्ये महामंडळ तसेच शासकीय कार्यालय सहभाग नोंदविणार आहेत.
अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ, वसंतराव नाईक आर्थीक मागास विकास महामंडळ, इतर मागासवर्गीय आर्थिक विकास महामंडळ, पुण्यश्लोक अहिल्यादेवी शेळी व मेंढी विकास महामंडळ इत्यादी महामंडळे तसेच कृषी उद्योग केंद्र, महिला व बालकल्याण विभाग, रेशीम विभाग आदी शासकीय विभागाचे सहभाग असेल.
स्वयंरोजगार इच्छूक उमेदवारांनी जास्तीत जास्त संख्येने रोजगार मेळाव्यास उपस्थित राहून विविध शासकीय योजनांचा लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी 0712-25312113 या नंबरवर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त यांनी केले आहे.