– मेळाव्यात 162 उमेदवारांची प्राथमिक निवड तर 25 उमेदवारांना जागेवरच नियुक्तीपत्राचे वाटप
भंडारा :- जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र भंडारा आणि शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, तुमसर ता.तुमसर जि.भंडारा यांचे संयुक्त विद्यमाने दिनांक 8 सप्टेंबर 2023 रोजी सकाळी 11.00 ते दुपारी 03.00 या वेळेत शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, तुमसर ता.तुमसर जि.भंडारा येथे पंडित दीनदयाल उपाध्याय महारोजगार मेळावा संपन्न झाला.
सदर रोजगार मेळाव्यात भंडारा,वर्धा,नागपूर, छत्रपती संभाजीनगर,पुणे येथील एकूण 08 नामांकित कंपन्या सहभागी झाल्या होत्या. त्यांचेमार्फत एकूण 2548 जागेकरीता उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. सदर मेळाव्यात एकूण 431 उमेदवारांनी उपस्थिती दर्शविली होती. त्यामध्ये 177 उमेदवारांनी प्रत्यक्ष, 165 उमेदवारांनी गुगल फॉर्मदवारे आणि 89 उमेदवारांनी पोर्टलदवारे मेळाव्यासाठी नोंदणी केली होती.
सदर रोजगार मेळाव्याच्या उदघाटनीय कार्यक्रमात उदघाटक तथा प्रमूख अतिथी म्हणून जे.व्ही.निंबार्ते, प्राचार्य शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, तुमसर हे उपस्थित होते. तसेच, सुधाकर झळके, सहायक आयुक्त जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, भंडारा, भाऊराव निंबार्ते, कनिष्ठ कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी, सुहास बोंदरे, जिल्हा समन्वयक अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ भंडारा आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
तसेच सदर कार्यक्रमात KAPSTON Facilities Management Limitted Hydrabad कंपनीकडून चंद्रकुमार हरींद्रवार, Sunsoor Srushti Enterprises Wardha कंपनीकडून सतिश कुर्वे, ARMS I Pvt.Ltd Under DUROVSLVE I Pvt.Ltd. Chhatrapati Sambhajinagar कंपनीकडून चंद्रकांत खाडे, BSA Corporation Ltd,Pune कंपनीकडून सुनिल अहिरे , NavKisan Bio Plaantec Ltd.Nagpur कंपनीकडून प्राणहंश रिनायत, Devgiri Forging Pvt Ltd Chhatrapatri Sambhajinagar कंपनीकडून शुभम पाटील, Trinetra Padum Krushi and Gramin Bahuuddeshiya Shikshan Sanstha Bhandara कंपनीकडून त्यांचे प्रतिनिधी , Mahindra And Mahindra Nagpur कंपनीकडून संजय अग्रवाल इ. विविध कंपन्याचे प्रतिनिधी उपस्थित होते.
सुधाकर झळके, सहायक आयुक्त यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. त्यामध्ये त्यांनी उमेदवारांनी आपले ध्येय निश्चीत करून रोजगार प्राप्त करण्याच्या दृष्टीने वाटचाल केली पाहिजे. याबाबत उमेदवारांना मार्गदर्शन केल तसेच, उमेदवारांनी मेळाव्याच्या ठिकाणी उपस्थित विविध महामंडळाच्या स्टॉल यांना भेटी देऊन त्यांच्या योजनांची माहिती घ्यावी, याबाबत उमेदवारांना आवाहन केले.
त्यानंतर, जे.व्ही.निंबार्ते, प्राचार्य यांनी उमेदवारांचा मुख्य उददेश हा आत्मनिर्भर बनन्याचा असला पाहीजे. भविष्यात आपल्याला काय करायचे आहे, काय बनायचे आहे हे आपण अगोदरपासूनच ठरवले पाहीजे. त्यादृष्टीने आपले प्रयत्न असले पाहीजे, याबाबत उमेदवारांना मार्गदर्शन केले.
भाऊराव निंबार्ते, कनिष्ठ कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी यांनी विभागामार्फत देण्यात येणा-या कौशल्य विकास प्रशिक्षणच्या माध्यमातूनही आपण रोजगार/स्वयंरोजगार प्राप्त करू शकतो. तसेच, विभागाच्या महास्वयंम पोर्टलवरून सेवायोजन नोंदणी कशी करायची याबाबत उमेदवारांना सविस्तर मार्गदर्शन केले.
सदर रोजगार मेळाव्याकरीता जिल्हयातील जिल्हा उद्योग केंद्र, भंडारा, महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ मर्या. संत रोहीदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ मर्या. साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ मर्या.महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ मर्या.भंडारा, वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ मर्या. इ.महामंडळांचे स्टॉल लावण्यात आले होते. सदर विविध महामंडळांना एकूण 327 उमेदवारांनी भेटी देऊन योजनांची माहिती घेतली.
अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ मर्या.या महामंडळास एकूण 319 उमेदवारांनी भेटी देऊन योजनांची माहिती घेतली. सुहास बोंदरे जिल्हा समन्वयक अधिकारी यांनी भेटी दिलेल्या उमेदवारांना त्यांच्या महामंडळामार्फत चालणा-या योजनांची समर्पक व सविस्तर माहिती दिली.
सदर रोजगार मेळावाच्या उदघाटनीय कार्यक्रमाचे सुत्रसंचलन श्री.विजय कावळे गटनिदेशक शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था मुलींची,भंडारा यांनी केले तर आभार एस.एल.धनवीज शिल्पनिदेशक, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था तुमसर यांनी मानले.
सदर रोजगार मेळावा यशस्वी करण्यासाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, भंडारा कार्यालयातील सोनु उके, जिल्हा कौशल्य विकास समन्वयक, श.क.सय्यद, वरिष्ठ लिपीक, मीरा मांजरेकर, महात्मा गांधी नॅशनल फेलो, आशालता वालदे, वरिष्ठ लिपीक, प्रिया माकोडे, वरिष्ठ लिपीक, सुहास बोंदरे जिल्हा समन्वयक, आय.जी. माटूरकर शिपाई यांनी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था मुलींची भंडारा येथील विजय कावळे गटनिदेशक यांनी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था तुमसर येथील सर्व कर्मचारी वृंद आदींनी अथक परीश्रम घेतले.