नागपुर – 8 मार्च या जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने नागपूर विद्यापीठाच्या पाली व बौद्ध अध्ययन विभागातील शिक्षक-शिक्षकेतर महिलांचा विद्यार्थी व विभागाच्या वतीने पुष्पवृक्ष देऊन सन्मान करण्यात आला.
पाली व बौद्ध अध्ययन विभागातर्फे विभाग प्रमुख प्रा डॉ नीरज बोधी यांनी तर विद्यार्थ्यांच्या वतीने उत्तम शेवडे यांनी पालीच्या प्राध्यापिका डॉ तुळसा डोंगरे, प्राध्यापिका डॉ कुमुद मेश्राम, प्राध्यापिका डॉ ज्वाला डोहाणे, प्राध्यापिका वसुंधरा पाटील, कर्मचारी गीता वाढोणे, सविता सोमकुवर, विद्यार्थिनी शुभांगी वासनिक आदींचा सन्मान करण्यात आला.