शेतकऱ्यांना त्रास होणार नाही याची धान खरेदी केंद्रांनी दक्षता घ्यावी – जिल्हाधिकारी संजय कोलते

– कारधा धान खरेदी केंद्रास जिल्हाधिकाऱ्यांची भेट

भंडारा :- आधारभूत किंमत धान खरेदी योजना खरीप पणन हंगाम 2024-25 मध्ये धान खरेदी केंद्रावरती शासनाच्या नियम व अटी नुसार कामकाज होत की नाही? याची खातरजमा करण्यासाठी जिल्हाधिकारी संजय कोलते यांनी दि. 4 डिसेंबर रोजी भंडारा सहकारी धान गिरणी मर्या. कारधा धान खरेदी केंद्रास भेट दिली. त्यावेळी त्यांच्यासोबत नरेश वंजारी जिल्हा पुरवठा अधिकारी,सुधीर पाटील जिल्हा पणन अधिकारी, रतनलाल ठाकरे सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी, टोंग ,धान्य खरेदी अधिकारी, संस्थेचे पदाधिकारी नरेश धुर्वे एस. बी. चंद्रे सहाय्यक जिल्हा पणन अधिकारी तसेच भागातील शेतकरी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी यांनी खरेदी झालेल्या धान गोदामांची तपासणी करून संस्थेकडील सातबारा, खरेदी रजिस्टर, बारदाना रजिस्टर तसेच BeAM पोर्टलवरील ऑनलाईन खरेदी रेकॉर्डची पाहणी करून संस्थेकडील कार्यालयीन सीसीटीव्ही यंत्रणेची पाहणी केली.

शासनाच्या नियमाप्रमाणे संस्थेकडील सर्व सिसिटीव्ही कार्यान्वित करण्याच्या सूचना देऊन शेतकऱ्यांच्या सोईसाठी संस्थेने सेवाभावी वृत्तीने काम करण्याच्या सक्त सूचना खरेदी केंद्र चालकास दिल्या. शेतकऱ्यांना त्रास होणार नाही अशा भावनेने आणि शेतकऱ्यांना केंद्रबिंदू मानून सर्व सेवा पुरवाव्यात, अशा सूचना सर्वांना दिल्या.

नरेश वंजारी जिल्हा पुरवठा अधिकारी, भंडारा यांनी देखील गोदामातील धान साठा तपासणी करताना शेतकऱ्यांकडून अचूक पद्धतीने वजन घेऊन कामकाज करण्याच्या सूचना दिल्या.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

हिटलर, माओ आणि आंबेडकर ! 

Thu Dec 5 , 2024
शिर्षक वाचून कुणीही अचंबेल. मीही लिहितांना ! पण , तसे ते घेऊ नये. केवळ समकालीन. शिवाय जागतिक. एवढाच संबंध. अन् संदर्भ सुध्दा ! १८८९ ला ॲडाॅल्फ हिटलर , १८९३ ला माओ त्से तुंग व १८९१ ला भीमराव आंबेडकर हे तिघेही महाचर्चित जन्माला आले. तिघांत दोन दोन वर्षाचा फरक आहे.‌ हिटलर आंबेडकरांपेक्षा दोन वर्षे मोठे तर माओ दोन वर्षे लहान होते. […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com