संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी ता प्र 16 :- स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्त गादा गावातील विद्यार्थी नवयुवक बहुदेशीय मंडळ गादा चे अध्यक्ष व ग्राम पंचायत सदस्य सचिन डांगे यांनी गावात रक्तदान शिबीर आयोजित करून स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव खऱ्या अर्थाने साजरा करून गावात आनंदमय वातावरण निर्माण केला तर गावातील व मित्र मंडळी यांनी या कार्यक्रमात सहभाग दर्शविला .तर या रक्तदान शिबिरात शेकडो च्या वर रक्तदात्यांनी स्वेच्छेने रक्तदान केले.
या रक्तदान शिबिरात माजी जी प सदस्य अनिल निधान, पंचायत समिती सभापती उमेश रडके यांच्यासह ग्रा प सदस्य सचिन डांगे, खुशाल येवले, वासुदेव चौधरी,युवराज चौधरी,विनोद चौधरी, प्रमोद डांगे, संभा घरडे, कामराण जाफरी,अमोल ठाकरे,मंगेश डांगे, मोहन मारबते,नितेश चौधरी,निलेश चौधरी, राहुल डांगे,अक्षय चौधरी, मंगेश मोंढे,निरंजन गेडेकर, श्रीधन उकुंडे,संघ शेंडे,आदित्य ठाकरे, सूरज चिपडे,संघा गजभिये, असविन खुरपडी,शुभम राऊत, आकाश ठाकरे,अविनाश भोयर, धीरज चीपडे, गौरव उसरे,श्रीकांत उकुंडे आदींनी उपस्थिती दर्शवून रक्तदान शिबिर यशस्वी केले.