यवतमाळ :- राज्यस्तरीय विशेष वैद्यकीय मदत कक्षाच्या माध्यमातून व धर्मादाय आयुक्त कार्यालयाच्या समन्वयाने वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्यावतीने विविध ठिकाणी मोफत सामुदायीक आरोग्य शिबीरांचे आयोजन करण्यात आले.
जिल्ह्यातील दुर्गम भागात वैद्यकीय महाविद्यालयातील विविध विषयातील तज्ञ डॉक्टर्सकडून हृदयरोग, स्त्रीरोग, सर्जरी, अस्थिरोग इत्यादी प्रकारच्या रुग्णांची तपासणी तथा रोग निदान आणि उपचार शिबीरे महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.गिरीश जतकर यांच्या मार्गदर्शनात १२ ठिकाणी घेण्यात आले. यात दोन हजारावर रुग्णांची तपासणी, ईसीजी, विविध प्रकारच्या रक्त चाचण्या, तपासणी करण्यात आली.
ज्या रुग्णांना अतिविशेष उपचाराची गरज आहे, अशा रुग्णांना पुढील उपचारासाठी वरिष्ठ रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. या शिबीरामध्ये रुग्णांना आभाकार्ड काढून देण्यात आले. शिबीराचे नोडल ऑफीसर म्हणून सहाय्यक प्रध्यापक डॉ.उमेश जोगे यांनी कामकाज पाहिले. या शिबीरास महाविद्यालयाचे अधीक्षक डॉ.सुरेंद्र भुयार तसेच जन औषधवैद्यकशास्त्र विभागाचे विभागप्रमुख डॉ.सुषमा ठाकरे व सहयोगी प्रध्यापक डॉ.विजय डोम्पले यांचे मार्गदर्शन लाभले.
शिबीरामध्ये समाजसेवा अधीक्षक वैद्यकीय रविंद्र निचळे, प्रमोद उभाळे, अनिल पिसे, आशिष खडसे तसेच जन औषधवैद्यकशास्त्र विभागातील पदव्युत्तर विद्यार्थी डॉ.प्रतिक बिकास, डॉ.नावेद अहमद, डॉ.सौरभ कोहळे व डॉ.आदित्य बुदानीया तसेच आंतरवासीता डॉक्टर्स यांनी सहभाग घेतला.