– बाबा जुमदेवजी यांच्या जयंतीनिमित्त घेतलेल्या या ज्ञानवर्धनि उपक्रमाची परिसरासह संपूर्ण तालुक्यात प्रशंसा
अरोली :- येथून जवळच असलेल्या सिरसोली गावात सामान्य ज्ञान व मानव धर्म परिचय या अभ्यासाक्रमावर आधारित एकूण 50 गुणांची परीक्षा आयोजित करण्यात आली होती. मुलांना स्पर्धां परीक्षेची आवड निर्माण व्हावी , नवोदय परीक्षेसारख्या स्पर्धांची माहिती व्हावी या उद्देशाने परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ सिरसोलीच्या वतीने आयोजन करण्यात आले होते. यात आबाल वृद्धाने वस्तुनिष्ठ स्वरूपांची परीक्षा दिली. शालेय विद्यार्थ्यांच्या कनिष्ठ गट व प्रौढांसाठी वरिष्ठ गट असे आयोजन करण्यात आले होते. ही परीक्षा दोन टप्प्यांची असून दुसरा टप्पा ऑक्टोबर मध्ये नियोजित आहे. या ज्ञानवर्धिनी उपक्रमाची परिसरासह संपूर्ण तालुक्यात प्रशंसा होत आहे.
या परीक्षेसाठी दीपक वंजारी यांनी विशेष योगदान दिले. तसेच प्रफुल निमकर, गुलशन मेहर, राकेश देशमुख चंद्रशेखर देशमुख, आशिष देशमुख, लीलाधर देशमुख, चांगदेव देशमुख, शंकर सपाटे, सोनी राम मेहर, बंडू कनोजे, परमेश्वर देशमुख, संजय देशमुख यांनी सहकार्य केले.