नागपूर : जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व महात्मा गांधी हायस्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने 12 जानेवारी रोजी राष्ट्रीय युवा दिनानिमित्त कायदेविषयक जनजागृतीविषयक शिबिराचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमास अध्यक्षस्थानी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव तथा दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर जयदीप पांडे होते. तर मंचावर सिंधू एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्षा वीणा बजाज, महात्मा गांधी हायस्कुलच्या मुख्याध्यापिका डीम्पी बजाज व जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे विधी स्वयंसेवक अर्शद तनवीर खान उपस्थित होते. स्वामी विवेकानंद यांचे विचार संपूर्ण जगात विख्यात आहेत. त्यांनी आपल्या विचारामुळे संपूर्ण जगात युवा वयातच प्रसिद्धी मिळविली होती. त्यामुळे त्यांचा जन्मदिवस हा युवा दिन म्हणून साजरा करण्यात येत असल्याचे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव तथा दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर जयदीप पांडे म्हणाले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दायना अब्राहम यांनी केले तर आभार डिम्पी बजाज यांनी मानले.
@ फाईल फोटो