मतदान जनजागृती करीता नगर परिषद देसाईगंज क्षेत्रात मॅराथॉनचे आयोजन

गडचिरोली :- लोकशाही बळकट करण्याचा उद्देशाने प्रत्येक नागरीकांनी आपल्या मतदानाचे हक्क बजावणे आवश्यक आहे. याबाबत जनजागृती निर्माण करून मतदानाची टक्केवारी वाढविण्याकरीता शासन स्तरावरून विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. या अंतर्गत 67- आरमोरी (अ.ज) विधान सभा मतदार संघ तथा उपविभागीय अधिकारी, देसाईगंज व डॉ. कुलभुषण रामटेके, मुख्याधिकारी नगर परिषद देसाईगंज यांचे मार्गदर्शनात देसाईगंज नगर परिषद क्षेत्रात मतदान जागृतीकरीता मॅराथॉन चे आयोजन करण्यात आले. नगर परिषदेचे कार्यालय अधिक्षक प्रमोद येरणे यांनी हिरवी झेंडी दाखवून मॅराथॉन ला सुरुवात करण्यात आली मॅराथॉनचा मार्गक्रम नगर परिषद कार्यालय, हूतात्मा स्मारक ते थोरात चौक ते फवारा चौक ते नगर परिषद सांस्कृतिक भवन असा होता.

यावेळी नगर परिषदेचे लेखापाल अविनाश राठोड, श्रीकांत वरकडे, अभियंता आशिष गेडाम,निशान घोनमोडे, कर निरीक्षक प्रफूल हटवार, स्वप्नील हमाने, सहायक प्रकल्प अधिकारी लवकुश उरकुडे, कुथे पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य महेश भावे, महात्मा गांधी विद्यालयाचे मुख्याध्यापक महेश मुंडले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यालयाचे शिक्षक जिभकाटे   व मो. सरीफ कनिष्ट महाविद्यालयाचे प्राचार्य शाहीन केंद्र प्रमुख अंबाजी आमनार, लिपीक वैशाली कुमरे, आम्रपालि चहांदे, लिडींग फायरमन राजू निंबेकर, हरगोविंद भुरे, विनोद मरस्कोल्हे, घनश्याम कांबळे, शितल सोनवाने, अरुण मोटघरे, जवाहर सोनेकर, विलास बोंदरे, प्रफुल दुपारे, राहूल भुरे, पिंकु सोनेकर व नगर परिषदेचे ईतर कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते.

यामध्ये महात्मा गांधी विद्यालय, कुथे पाटील महाविद्याल, डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यालय व मो. सरीफ कनिष्ट महाविद्यालयाचे ईत्यादी विद्यालय व महाविद्यालयाचे विद्यार्थी-विद्यार्थीनी सहभागी झाले होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

ग्रामपंचायत येसंबा येथे बिरसा मुंडा यांची 149 वी जयंती साजरी 

Sat Nov 16 , 2024
कोदामेंढी :- पंचायत समिती मौदा, जि प तारसा- चाचेर, पं स चाचेर अंतर्गत येत असलेल्या ग्रामपंचायत येसंबा कार्यालयात दरवर्षीप्रमाणे यंदाही बिरसा मुंडा याची 149 वी जयंती साजरी करण्यात आली.उपसरपंच धनराज हारोडे यांनी बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन करून माल्यर्पण करण्यात आले.याप्रसंगी गावातील प्रतिष्ठित नागरिक फुलचंद इरपाते, पोलिस पाटील नरेंद्र राऊत, ग्रामपंचायत सदस्या करिश्मा पानतावणे, विठ्ठलराव महाल्ले, बबनराव घरजाळे, नंदलाल धुर्वे, […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!