राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त विद्यापीठात व्याख्यानांचे आयोजन

अमरावती :- राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्ताने संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठातील डॉ. के.जी. देशमुख सभागृहामध्ये दिनांक 25 फेब्राुवारी व 06 मार्च रोजी व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले आहे. विज्ञानातील क्लिष्ट संकल्पना सोप्या भाषेत सर्वसामान्यांना समजाव्यात, या दृष्टीने या व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले आहे.

पॉप्युलर सायन्स लेक्चर्स व स्लाईड शो/डेमोस्ट्रेशन या शीर्षकाखाली या व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले आहे. दि. 25 फेब्राुवारी रोजी पुणे येथील प्रसिध्द सिरम इन्स्टिटूट ऑफ इंडिया प्रा. लि. चे उपसंचालक डॉ. जगदीश झाडे यांचे ‘रोल ऑफ व्हॅक्सिन्स इन ग्लोबल हेल्थ’ या विषयावर व दि. 06 मार्च रोजी अमरावतीचे सुपुत्र आणि ग्रीन सर्कल अमरावतीचे संचालक डॉ. विजय इंगोले यांचे ‘सायन्स फॉर जनरल पब्लिक’ या विषयावर व्याख्यान होणार आहे. तज्ञांच्या या अतिशय अभ्यासपूर्ण व्याख्यानाला शहरातील विद्यार्थी, शिक्षक, नागरिकांनी मोठयासंख्येने उपस्थित राहून व्याख्यानाचा लाभ घ्यावा, असे आवाहन विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रमोद येवले, प्र-कुलगुरू डॉ. प्रसाद वाडेगांवकर, कुलसचिव डॉ. तुषार देशमुख, राष्ट्रीय विज्ञान दिवस समन्वयक डॉ. अनिता पाटील व संयोजकांनी केले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

25th Convocation of the Swami Ramanand Teerth Marathwada University, Nanded

Sat Feb 25 , 2023
Governor confers Honorary D.Litt. on Nitin Gadkari & Kamalkishor Kadam Nanded :-Maharashtra Governor and Chancellor of state universities Ramesh Bais presided over the 25th Annual Convocation of the Swami Ramanand Teerth Marathwada University (SRTMU), Nanded through online mode. The degree of Honorary Doctor of Letters (D.Litt.) was conferred on Union Minister of Road Transport and Highways Nitin Gadkari and former […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com