संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
– 22 सप्टेंबर रोजी सकाळी 9 ते सायंकाळी 4.30पर्यंत सामूहिक ध्यान साधना होणार
कामठी :- विश्वविख्यात ड्रॅगन पॅलेस टेम्पल परिसर असलेले ड्रॅगन पॅलेस विपश्यना मेडिटेशन सेंटर च्या स्थापना दिनानिमित्त रविवार 22 सप्टेंबर 2024 ला सकाळी 9 ते सायंकाळी साडे चार वाजेपर्यंत एक दिवसीय भव्य विपश्यना ध्यान साधना शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे. या शिबिरामध्ये सहाय्यक आचार्य व बाल शिबीर शिक्षक यांना विशेष निमंत्रित करण्यात आलेले आहे.या एक दिवसीय ध्यान साधना शिबिरात किमान एक दहा दिवसीय शिबीर झालेल्या साधकांना थेट सहभाग घेता येणार आहे.
उल्लेखनीय आहे की,विश्वविख्यात ड्रॅगन पॅलेस टेम्पल परिसरात असलेले ड्रॅगन पॅलेस विपश्यना मेडिटेशन सेंटर चे उद्घाटन 22 सप्टेंबर 2017 रोजी देशाचे महामहिम राष्ट्रपती रामनाथ कोविद यांच्या शुभ हस्ते थाटात संपन्न झाले असल्यामुळे इतिहासात सुवर्ण अक्षराने लिहिण्यासारखे आहे. या विपश्यना सेंटर च्या 5 व्या वर्धापन दिनानिमित्त या भव्य शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे.
ड्रॅगन पॅलेस विपश्यना मेडिटेशन सेंटर येथे 10 दिवस ,3 दिवस व दर पौर्णिमेला एक दिवसिय शिबिराचे आयोजन नियमित केल्या जात असते या शिबिरामध्ये मोठ्या प्रमाणात देशाच्या कोण्या कोपऱ्यातून साधक सहभागी होऊन ध्यान शिबिराचा लाभ घेत असतात. शिबिरामध्ये सहभागी होण्याकरिता
http://forms.gle/HWPAahSQKXLnRw3A या वेबसाईटवर ऑनलाईन च्या माध्यमातून रजिस्ट्रेशन करण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात महाराष्ट्र राज्य व्यक्तिरिक्त इतर राज्यातून सुद्धा साधकांना ड्रॅगन पॅलेस विपस्यना मेडिटेशन सेंटर मध्ये ध्यान करण्याची संधी मिळत असल्याची माहिती ड्रॅगन पॅलेस विपस्यना मेडिटेशन सेंटर च्या प्रमुख व ओगावा सोसायटीच्या अध्यक्षा ऍड सुलेखा कुंभारे यांनी दिली.