नागपूर : जिल्ह्यातील महिला व बाल विकास विभागांतर्गत शासकीय, स्वयंसेवी संस्थांमध्ये पुनर्वसनासाठी दाखल झालेल्या अनाथ, निराधार बालकांमधील सुप्त गुणांना वाव देण्यासाठी चाचा नेहरू बाल क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. उद्या, 17 जानेवारी रोजी सकाळी 10 वाजता ललित कला भवन, कामगार कल्याण मंडळ येथे आयोजित या महोत्सवाचे उदघाटन जिल्हाधिकारी डॅा. विपीन इटनकर यांच्या हस्ते होणार आहे.
जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयाने या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा, जिल्हा पोलिस अधीक्षक (ग्रामीण) विशाल आनंद, पीठासीन अधिकारी तथा अध्यक्ष बाल न्याय मंडळ सविता माळी, स्लॅम सॅाकरचे संस्थापक विजय बारसे आणि बाल कल्याण समितीच्या अध्यक्षा छाया अरुण उपस्थित राहणार आहेत.
कार्यक्रमाला जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हा महिला व बालविकास विभागातर्फे करण्यात आले आहे.
@ फाईल फोटो