गडचिरोली : जिल्हा कोषागार कार्यालय, गडचिरोली येथे 01 फेब्रुवारी रोजी वर्धापन दिन मोठ्या आनंद हर्षउल्हासाने साजरा करण्यांत आला. वर्धापन दिनानिमित्ताने जिल्हा कोषागार कार्यालयात रक्तदान शिबीर, सांस्कृतीक कार्यक्रम घेण्यांत आले. त्यानिमित्ताने उमेश गायकवाड मुख्य लेखा व वित्त अधिकारी जिल्हा परीषद, गडचिरोली यांच्या हस्ते रक्तदान शिबीराचे उदघाटन करून त्यांनी स्वतः रक्तदान केले. तसेच लक्ष्मण लिंगालोड कोषागार अधिकारी, अभिजीत मेंगडे सहा.संचा.स्था. नि.ले तसेच कोषागार कार्यालयातील अप्पर कोषागार अधिकारी कुसराम, मनोज कंगाली, उके आणि कार्यालयातील उपकोषागार अधिकारी चहारे, पोलके, मुधोळकर, ढोंगे, खापरे, हे उपस्थित होते. तसेच इतर कार्यालयात कार्यरत वित्त विभागाचे सहाययक लेखा अधिकारी , तलमले, मेश्राम, धात्रक, वाळके, बोरसरे, दहीकर, सोनकर, वासनिक व सचिन भांडरे लिपिक यांनीसुध्दा वर्धापन दिनानिमित्याने रक्तदान शिबीरामध्ये रक्तदान करून मोलाचा कामगीरी बजावली. तसेच जिल्हा कोषागार कार्यालयातील व स्थानिक निधी लेखा गडचिरोली कार्यालयातील अनेक कर्मचारी गावंडे, चाटे, लंबेे, किरंगे, श्रुभम यांनी सुध्दा रक्तदान करुन 1 फेब्रुवारी कोषागार वर्धापन दिन उत्साहात साजरा केला.
रक्तदान शिबिरामध्ये सहभाग घेणा-या अधिकारी व कर्मचारी यांना प्रमाणपत्र देण्यांत आले. त्यानंतर कार्यालयात सांस्कृतीक कार्यक्रम घेण्यांत आला व शेवटी वर्धापन दिनाची सांगता करण्यांत आली.