दापोरी येथे खेळ मानाच्या पैठणीचा कार्यक्रमाचे आयोजन

– शेकडो महिलांना कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहन.

दापोरी :- मोर्शी विधानसभा मतदार संघामध्ये विक्रम ठाकरे मित्र परिवारातर्फे मातृशक्ती जागर-खेळ मानाच्या पैठणीचा या कार्यक्रमाचे आयोजन मोठ्या प्रमाणात सुरू आहे. अश्या प्रेरणादायी कार्यक्रमांचे आयोजन करून सोबतच शिस्त, सामाजिक, नितीमुल्ये, नैतीकता तथा आदर्शाचे वास्तव धडे देऊन त्यातूनच सकारात्मक दृष्टीकोनाने उन्नत जीवनाच्या मार्गाने प्रवास करण्यासाठी आत्मबळ वाढविण्यासाठी मतदार संघातील हजारो महिलांसाठी मातृशक्ती जागर-खेळ मानाच्या पैठणीचा या आयोजन करण्यात आले आहे.

विक्रम ठाकरे मित्रपरिवारा तर्फे दापोरी येथील श्री संत लालदासबाबा सभागृहामध्ये दिनांक ३० जुलै रोजी दुपारी 4 वाजता मातृशक्ती जागर-खेळ मानाच्या पैठणीचा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणून झी टीव्ही फेम कॉमेडी कलाकार मिमिक्री आर्टिस्ट संदीप जाधव हे महिलांकरिता विविध मनोरंजनात्मक खेळ, गमती जमती,गमतीदार उखाणे तसेच ऑर्केस्ट्रा घेऊन येत आहेत. खेळ मानाच्या पैठणीचा या महिलांकरिता विशेष मनोरंजनात्मक कार्यक्रमामध्ये विविध गमतीदार व मनोरंजनात्मक खेळामध्ये विजेत्या महिलांना बक्षीस म्हणून मानाची पैठणी देण्यात येणार आहे. तसेच इतर विजेत्या महिलांना आकर्षक बक्षिसे सुद्धा दिली जाणार आहे. या कार्यक्रमांमध्ये सहभागी सर्वच महिलांना लकी ड्रॉ द्वारे बक्षीस जिंकण्याची संधी सुद्धा मिळणार आहे. आपल्या दैनंदिन संसारिक व्यस्ततेमधून थोडा का होईना माता भगिनींना विरंगुळा मिळावा तसेच मातृशक्तीच्या ऋणातून उतराई होण्याचा माणस ठेवून विक्रम ठाकरे मित्रपरिवार द्वारे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

अनेक माध्यमांमधून किंवा केवळ टीव्हीच्या पडद्यावर पाहता येणारा मनोरंजनात्मक कार्यक्रम विक्रम ठाकरे परिवाराच्या माध्यमातून महिला भगिनींच्या विशेष मनोरंजनाकरिता दापोरी येथे आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमांमध्ये महिलांच्या विशेष कौशल्यांना वाव आणि हक्काचे व्यासपीठ मिळावे तसेच त्यांना मनोरंजनात्मक कार्यक्रमाचा आस्वाद घेता यावा या दृष्टिकोनातून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी दापोरी येथील सर्व माता भगिनींनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून या कार्यक्रमाचा आनंद घ्यावा असे आवाहन माजी पंचायत समिती सभापती विक्रम ठाकरे व विक्रम ठाकरे मित्रपरिवार यांच्यातर्फे करण्यात आले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

स्वतंत्र विदर्भ राज्य निर्माण करा

Wed Jul 31 , 2024
नागपूर :- लवकरात लवकर स्वतंत्र विदर्भ राज्याची निर्मिती करावी, अन्यथा येत्या १५ ऑगस्टपासून चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा येथील मस्की दाम्पत्य लोखंडी पिंजऱ्यात आमरण उपोषण करणार असल्याची माहिती जय विदर्भ पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अरुण केदार यांनी सोमवारी आयोजित पत्रकार परिषदेत दिली. आज विकासाच्या दृष्टीने विदर्भ महाराष्ट्रच्या १०० पट मागासला आहे. यास सर्वस्वी आमचे आजी माजी आमदार-खासदार, मंत्री काँग्रेस व भाजपचे मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री हे […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com