जादुटोणा प्रतिबंध करण्यासाठी कार्यशाळेचे आयोजन करा – विजयलक्ष्मी बिदरी

नागपूर :- जादुटोणा विरोधी कायद्याबाबत जनसामान्यांना जास्तीत जास्त माहिती व्हावी यासाठी जिल्हास्तरावर आणि तालुकास्तरावर जनजागृती कार्यशाळेचे आयोजन करून कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या सूचना विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी आज दिल्या.

विभागीय आयुक्त कार्यालयात आज जादुटोणा विरोधी कायदा जनजागृती प्रचार व प्रसार अंमलबजावणी समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती यावेळी त्या बोलत होत्या.

बैठकीला विशेष पोलीस महानिरिक्षक डॉ. छेरिंग दोरजे, अतिरिक्त जिल्हाधिकारी आशा पठाण, समाज कल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त डॉ.सिध्दार्थ गायकवाड, सहायक आयुक्त सुकेशनी तेलगेाटे, ग्रामीणचे पोलीस अधीक्षक विजय माहुरकर, दुरदृश्य प्रणालीव्दारे नागपूर विभागातील जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, सहायक आयुक्त, मुख्य कार्यकारी अधिकारी, शासकीय अभियोक्ता यांची उपस्थिती होती.

बिदरी यांनी याप्रसंगी जादुटोणा विषयक गैरसमजुतीतून नागपूर विभागात कुणाचे शोषण किंवा छळ झाले आहे का ? याबाबत विचारणा केली. जादुटोणा विरोधी कायद्याचा प्रचार व प्रसार करण्यासाठी नेमलेल्या समितीमध्ये विभागीय समन्वयक यांची नियुक्ती करण्याच्या सूचना यावेळी दिल्या.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

‘माझी माती माझा देश’ अभियानांतर्गत अमृत कलश यात्रा राज्यस्तरीय सोहळा

Fri Oct 27 , 2023
– मातृभूमीविषयी प्रेम आणि संस्कृतीविषयी आदर महत्वाचा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबई :- सर्वसामान्य माणूस केंद्रबिंदू मानून केंद्र आणि राज्य शासन काम करीत आहे, यामागे छत्रपती शिवाजी महाराजांची प्रेरणा आहे. पायाभूत सुविधा, इमारती, मोठे प्रकल्प, भौतिक सुविधा याबरोबरच आपल्या मातृभूमीविषयी प्रेम, संस्कृतीविषयी आदर तितकाच महत्वाचा आहे. त्यामुळेच ‘माझी माती माझा देश अभियान’ हे देशासाठी शहीद होणाऱ्या वीरांच्या त्यागाला, बलिदानाला नमन […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com