नागपूर :- मध्य नागपूर स्थित न्यू इंग्लिश कनिष्ठ महाविद्यालय, महाल येथे संस्थेच्या लाल रंगाच्या इमारतीला 100 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्याने दिनांक 26 नोव्हेंबर 2022 ला पॉवर पॉईंट प्रेसेंटेशन स्पर्धेचं आयोजन करण्यात आले होते. इयत्ता 10वी च्या विद्यार्थ्यांकरिता ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. स्पर्धेत विविध शाळेच्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला.
या स्पर्धेत तेजस्विनी कॉन्व्हेंटचा प्रथमेश विंदेशकर याने पहिला क्रमांक पटकावला तर दुसरा व तिसरा क्रमांक आदर्श विद्यामंदिर येथील प्रयुक्ती पंचभाई व राजेंद्र हायस्कुलचा आदित्य शर्मा यांनी प्राप्त केला. सहभागी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांनी अतिशय मेहनत घेऊन आपले प्रेसेंटेशन प्रभावीपणे सादर केले. ‘स्पेस मिशन’ / ‘बायोटेकनॉलॉजी’ यापैकी एका विषयावर विद्यार्थ्यांनी स्लाईड्स तयार करण्यास सांगितले होते. या स्पर्धेचे संचालन कनिष्ठ महाविद्यालाच्या शिक्षिका स्मिता झंझाड यांनी केले तर स्पर्धेचे परीक्षण कनिष्ठ महाविध्यालाचे शिक्षक संजीव सराफ व सचिन लांजेवार यांनी केले.
संस्थेचे सचिव अजेय धाक्रस, संस्थेचे सदस्य मंगेश वालेकर, शाळेच्या मुख्याध्यापिका उज्वला राहटे व कनिष्ठ विद्यालयाच्या सर्व शिक्षकांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे प्रभावी कामगिरीबद्दल अभिनंदन व कौतुक केले.