नागपूर :- जिल्हा कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या वतीने 22 मार्चला एक दिवसीय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. पात्रताधारक उमेदवारांनी रोजगार मेळाव्यामध्ये उपस्थित राहून रोजगार मेळाव्याचा जास्तीत- जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त, आणि यंग प्रोफेशनल, नॅशनल करीअर सर्व्हीस, नागपूर यांनी केले आहे.
या रोजगार मेळाव्याचा लाभ घेण्याकरीता ईच्छूक उमेदवारांनी स्वत:च्या सर्व शैक्षणिक कागदपत्रसह व आधार कार्डची फोटोकॉपीसह जिल्हा कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र,नागपूर प्रशासकीय ईमारत क्र.2, दुसरा माळा, येथे दुपारी 12 ते 4 वाजेपर्यत हजर रहावे. या रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून याप्रमाणे जिल्हयातील बेरोजगार उमेदवारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध आहेत.
कृषी पर्यवेक्षक- डिप्लोमा कृषी, प्लांट पर्यवेक्षक- आयटीआय कोणतीही शाखा, प्रोडक्शन इंजिनियर- बी.ई. मेक्यानिकल आणि मेक्यानिकल आणि ऑटोमोबाईल डिप्लोमा, प्राडक्शन मॅनेजर- डिप्लोमा किंवा बीई मेक्यानिकल, केमिस्ट- बीएसी/ एमएससी बॉयोटेक्नालॉजी, केमिस्ट्री. अकॉऊंट एक्झीकेटींव्ह- एम कॉम किंवा बी. कॉम आणि टेलेकॉलरसाठी कोणताही पदवीधर किंवा बारावी पास असलेल्या उमेदवार पात्र राहील.