– ह्मदयविकार, ह्मदयाघात प्रसंगी करावयाच्या उपाययोजनांबाबत करणार मार्गदर्शन
अमरावती :-भारतात दिवसेंदिवस ह्मदयविकार अथवा ह्मदयाघाताने अकाली मृत्यूचे वाढते प्रमाण लक्षात घेता अशा प्रसंगी तातडीच्या काय उपाययोजना कराव्यात, याबाबत संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठातील आरोग्य केंद्राच्यावतीने विद्यापीठातील सर्व शैक्षणिक व प्रशासकीय विभागप्रमुख, शिक्षक, अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी, विद्यार्थीनींकरीता मंगळवार दि. 12 सप्टेंबर, 2023 रोजी दुपारी 3.00 वा. विद्यापीठ परिसरातील डॉ. के.जी. देशमुख सभागृहामध्ये उद्बोधन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी अमरावती शहरातील प्रसिध्द ह्मदयरोग तज्ज्ञ डॉ. राहुल कडू हे ह्मदयविकार, ह्मदयाघातप्रसंगी तातडीने करावयाच्या उपाययोजना तसेच प्रात्याक्षिकांसह प्रशिक्षणही देणार आहेत.
सामाजिक जाणीवेतून एखाद्याचे प्राण वाचविण्यासाठी या उद्बोधन व प्रशिक्षण कार्यक्रमामधून निश्चितच संधी मिळेल, त्यामुळे विद्यापीठातील सर्वांनी आरोग्याच्या दृष्टीने या उपयुक्त अशा कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन कुलसचिव डॉ. तुषार देशमुख, विद्यापीठ आरोग्य केद्राच्या आरोग्य अधिकारी डॉ. स्मिता थोरात यांनी केले आहे.