– मनपा आयुक्तांचे आदेश
नागपूर :- नागपूर महानगरपालिकाद्वारे ऑरेंज सिटी स्ट्रीट प्रकल्पातील भूखंड क्र.5 चे दक्षिणेकडील रस्ता पुढील 15 दिवसांपर्यंत कोणत्याही वाहतूकीसाठी प्रतिबंधित करण्यात आला आहे. या संबधित आदेश नागपूर महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी निर्गमित केले आहे.
सदर रस्त्यावरील वाहतूक बंद केल्यानंतर रस्त्यावरील वाहतूक ऑरेंज सिटी स्ट्रीट प्रकल्प मधील भुखंड क्रं. 5 चे दक्षिणेकडील रस्ता AB व CD पर्यंत नागरिकांकरिता बंद करणे आवश्यक असल्याने नागपूर महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी आदेश दिले आहेत.
आदेशानुसार, रस्त्यावरील वाहतूक भुखंड क्रं. 5 चे उत्तरेकडील 24.00 मीटर रस्त्यावरुन वळती करणे तसेच दक्षिणेकडील रहिवासी नागरिकांना 24.00 मीटर रस्त्याला 9.00 मीटरचा रस्ता नाल्यानंतर असलेल्या रस्त्यावरुन वाहतूक वळती करण्यात आला आहे. संपूर्ण मार्ग हा पुढील 15 दिवस बंद राहणार असून रस्त्यावरील कामाचे कंत्राटदार आणि कार्यकारी अभियंता, यांनी खालील बाबींची सुरक्षिततेच्या दृष्टीने दक्षता घ्यांवी असे आदेशात नमुद करण्यात आले आहे.