निवडणुकीच्या तोंडावर विरोधकांचे लबाडखोरीचे राजकारण – जयदीप कवाडे

– ‘पीरिपा’चे कार्याध्यक्ष जयदीप कवाडेंची राजकोट किल्ल्याला भेट

सिंधुदुर्ग :- सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणमधील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याची दुर्देवी घटनेनंतर देशातील प्रत्येक शिवप्रेमी आज दु:ख व्यक्त करीत आहे. मात्र, पुतळा कोसळल्याची घटना ही ऍक्सिडेंटल होती. महायुती सरकारने प्रकरणातील शिल्पकार जयदीप आपटे आणि स्ट्रक्चरल कन्सल्टंट चेतन पाटील यांच्यावर कायदेशीर कार्यवाही केली आहे. शिवाय घटनेबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदीसह महायुती सरकारचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी जनतेची जाहिर माफी मागितली आहे. तरी महाविकास आघाडी तर्फे निवडणुकीच्या तोंडावर आंदोलन करून मतांचा फायद्या घेण्यासाठी लबाडखोरीचे राजकारण करण्यात येत आहे, असा आरोप पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष जयदीप कवाडे यांनी केले.

राजकोट किल्ल्याला पीरिपाचे महाराष्ट्र पदाधिकाऱ्यांसह जयदीप कवाडे यांनी बुधवारी भेट देऊन छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळण्याची दुर्घटना घडलेल्या जागेची पाहणी केली. यावेळी महाराष्ट्र प्रदेश संघटक कपिल लिंगायत, प्रदेश उपाध्यक्ष मृणाल गोस्वामी, अशोक कांबळे, जितेंद्र कांबळे, करवीर संजय चांदुरकर, अंकुश कांबळे, संजय जिजगे, बबन कांबळे, मुस्तफा, कुशीनारा सोमकुंवर, युवराज कांबळे, जिल्हा अध्यक्ष युवराज कांबळे व पदाधिकारी लहू मोरे, संतोष राठोड यांची उपस्थिती होती. पुढे बोलतांना जयदीप कवाडे म्हणाले की, नौदलाने पुतळा उभारण्याची वर्कऑर्डर शिल्पकार जयदीप आपटे याच्या कंपनीला दिली होती आणि स्ट्रक्चरल इंजिनिअरिंगची जबाबदारी चेतन पाटीलकडे होती. त्यामुळे पुतळ्याचे बाह्य रूप आणि अंतर्गत मजबुतीचे काम या दोन्ही जबाबदार्‍या या दोघांच्याही होत्या. परंतु त्या गांभीर्याने पाळल्या गेल्या नाहीत हे आता पुढे आले आहे. म्हणूनच दोघांनी संगनमताने निकृष्ट काम केले हे सिद्ध होत आहे. दुसरीकडे पुतळा कोसळून आज दहा दिवस उलटून गेली आहेत. परंतु, पुतळ्याचे पडलेले अवशेष अजूनही त्याच ठिकाणी पडून आहेत. चौकशी समितीने पुतळ्याला भेट दिल्यानंतर तेथील अवशेष हे सन्मानजनक उचलून घेण्याचे काम सरकारने तातडीने करण्याची मागणी जयदीप कवाडे यांनी केली.

पुतळा कोसळल्‍यानंतर महाविकास आघाडी यांनी आंदोलनाचा शंडू हाती घेतला आहे. परंतु, या दुर्देवी घटनेनंतर महायुती सरकारने दोषींना वर गुन्हे दाखल केले असून कारणे शोधनारी समिती सुद्धा स्थापित केली आहे. नव्याने उभारण्यात येणाऱ्या पुतळ्यासाठी योग्य पाऊले टाकण्याचा प्रयत्न महायुती सरकार करीत आहे. परंतु, आगामी विधानसभा निवडणुक असल्याने विरोधकांचे गलिच्छ राजकारण होत आहे. महायुती सरकारला टार्गेट करण्याचा काम आज विरोधक करत आहेत. पुतळा कोसळल्याची घटना ही दुर्देवी होती, त्याचा निषेधच. मात्र, या घटनेचे राजकीय फायदा मिळविण्यासाठी विरोधकांचे आंदोलनाद्वारे राजकारण सुरू असल्याची टिकाही जयदीप कवाडे यांनी केली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

अधिकाधिक ज्येष्ठांनी मुख्यमंत्री-वयोश्री योजनेचा लाभ घ्यावा - आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी

Thu Sep 5 , 2024
– आयुक्तांनी केली ज्येष्ठ नागरिक मंडळांच्या प्रतिनिधींशी चर्चा नागपूर :- राज्य शासनाद्वारे ज्येष्ठ नागरिकांना दैनदिन जीवनात सामान्य स्थितीत जगण्यासाठी सुरु करण्यात आलेल्या मुख्यमंत्री-वयोश्री योजेनाची संपूर्ण प्रक्रिया सुलभ व सरळ करण्यात आली असून, अधिकाधिक ज्येष्ठ नागरिकांना याचा लाभ घ्यावा, असे आवाहन मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी केले. मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली आयुक्त सभा […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!