– नागपूरच्या आयकर विभागाचे प्रमुख आयुक्त आर.आर. प्रसाद यांचे प्रतिपादन
नागपूर – आर्थिक क्षेत्रात आत्मनिर्भरता आल्यानेच देश प्रगती करू शकतो .खाजगी आणि सार्वजनिक क्षेत्राचे योगदान यासाठी फार महत्त्वाचे ठरते. देशाला आधुनिकतिकडे घेऊन जाण्यासाठी विभिन्न विभागांमध्ये समन्वय आवश्यक असल्याचे प्रतिपादन नागपूरच्या आयकर विभागाचे प्रमुख आयुक्त आर.आर. प्रसाद यांनी आज केले. डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा अंतर्गत अर्थ मंत्रालयाच्या गुंतवणूक आणि सार्वजनिक मालमत्ता व्यवस्थापन- दीपम विभागाद्वारे आयोजित ‘बाजाराच्या माध्यमातून संपत्तीची निर्मिती’ या विषयावरील परिषदेचे उद्घाटन नागपूरात त्यांच्या हस्ते झालं. केंद्रीय वित्त आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्री निर्मला सीतारामन यांनी भारतीय विज्ञान संस्था (IISc), बेंगळुरू येथून या परिषदेचे राष्ट्रीय स्तरावर उद्घाटन करुन परिषदेला संबोधित केले. देशाच्या 75 शहरात अशाच प्रकारच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते सर्व शहरे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे जोडली गेली. जनतेला गुंतवणूक आणि संपतीची निर्मिती याबाबत शिक्षित, प्रोत्साहित आणि सक्षम करण्याचा या उपक्रमाचा उद्देश आहे.
परिषदेला संबोधित करताना मंत्री निर्मला सीतारामन म्हणाल्या की, धोरणात्मक निर्गुंतवणुकीमुळे भारत गुंतवणुकीच्या अधिक संधी निर्माण करून विकासाच्या मार्गावर पुढे जात आहे. भारत ईटीएफ (एक्सचेंज ट्रेडेड फंड) आणि बाँड मार्केटच्या सखोल आणि विविधीकरणाचा अर्थव्यवस्थेला कसा फायदा झाला याबद्दल त्यांनी यावेळी सांगितले.केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ.भागवत किसनराव कराड यांनी नवी दिल्लीतल्या विज्ञान भवनात दीपप्रज्वलन करून परिषदेचे उद्घाटन केले. निर्गुंतवणूक जनभागीदारी झाली आहे कारण ते अधिक प्रभावी होण्यासाठी अनेक लोक त्यात सहभागी होत आहेत. दीपमने उचललेल्या पावलांमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेनुसार देशाच्या विकासाला चालना मिळाली आहे, असे डॉ.भागवत यांनी यावेळी सांगितल.
७५ शहरांतील स्थानिक ठिकाणी या कार्यक्रमात आर्थिक तज्ञ आणि व्यावसायिकांनी भाषणे केली .या कार्यक्रमात भारतीय भांडवली बाजाराची गेल्या ७५ वर्षांतील वाढ, वाढत्या स्वतंत्र गुंतवणूकदार म्हणून महिला, आर्थिक साक्षरता आणि भारतीय भांडवली बाजाराचे भविष्य अशा विस्तृत विषयांवर चर्चा झाली.