दिल्लीतील साहित्य संमेलनाच्या पार्श्वभूमीवर माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या वतीने अभिजात मराठीचा ‘ऑनलाईन जागर’

– व्हिडिओ पाठवून सहभागी होण्याचे आवाहन

यवतमाळ :- दिल्ली येथे दि. 21 ते 23 फेब्रुवारीदरम्यान होणाऱ्या 98 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने अभिजात मराठीचा ‘ऑनलाइन जागर’ हा अनोखा उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमात आपल्या कलागुणांचा व्हिडिओ शेअर करून देश विदेशातील मराठी माणसांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळणार आहे.

या उपक्रमात कसे सहभागी व्हाल? आपण स्वतः कवी, लेखक, कलाकार, गायक असाल तर आपल्या स्वरचित कवितेचा अथवा आपल्या कलाकृतीचा एक सुंदर व्हिडिओ तयार करून आम्हाला पाठवा. केवळ आपल्याच कविता नाही तर इतर मान्यवर कवींच्या कवितांचे सादरीकरणही (वाचन) आपण करू शकता. याबरोबरच गझल वाचन, गायन, लोककला सादरीकरण अशा अनेक स्वरूपात आपण या उपक्रमात सहभागी होऊ शकतात.

अभिजात मराठीच्या या ऑनलाईन जागरामध्ये आपण अभंग, पोवाडे, नाट्यछटा, लघुकथा, गायन, भारुड आदी कलांच्या माध्यमातून सहभागी होऊ शकता. अभिजात मराठीच्या या उत्सवात आपला सहभाग हा आपल्या भाषेचा गौरव वाढविणारा ठरेल. तर चला मग करा रेकॉर्ड आपला व्हिडिओ आणि पाठवा आम्हाला. आपले व्हिडिओ माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाच्या ‘महासंवाद’ या पोर्टल वर आणि महासंचालनालयाच्या राज्यभरातील कार्यालयांच्या अधिकृत समाजमाध्यमांवर प्रसिद्ध करण्यात येतील.

आपले व्हिडिओ dgiprdlo@gmail.com या ईमेलवर अथवा ९८९२६६०९३३ आणि ७५०४६९६७८६ या व्हॉट्सअँप क्रमांक किंवा जिल्हा माहिती कार्यालय यवतमाळच्या dio.yavatmal@gmail.com या ईमेलवर देखील पाठवता येतील. महाराष्ट्राला साहित्याची समृद्ध परंपरा लाभली आहे. ९८ वे अखील भारतीय मराठी साहित्य संमेलन हे मराठी भाषेच्या श्रीमंतीचा उत्सव साजरा करण्याची संधी आहे. आपल्या शब्दांनी आणि कलाकृतींनी ९८वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन अधिक संस्मरणीय बनवावे, असे आवाहन माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या वतीने करण्यात येत आहे. जिल्ह्यातील जास्तीत जास्त कलावंतांनी यात सहभाही व्हावे, असे आवाहन जिल्हा माहिती कार्यालयाने केले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

रोजगार मेळाव्यात 190 उमेदवारांची प्राथमिक निवड

Fri Feb 14 , 2025
यवतमाळ :- जिल्हा कौशल्य विकास, रोजगार उद्योजकता मार्गदर्शन केंद्रांतर्गत मॉडेल करिअर सेंटर व बाबाजी दाते शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या संयुक्त विद्यमानाने पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन दि. 11 फेब्रुवारी रोजी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत करण्यात आले होते. या मेळाव्यात 190 उमेदवारांची विविध नामांकित कंपनीमध्ये प्राथमिक निवड करण्यात आली. मेळाव्यामध्ये मॅक वेहिकल प्रायव्हेट लिमिटेड, सहयोग मल्टीस्टेट क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!