अमरदिप बडगे
गोंदिया :- गोंदिया जिल्ह्याच्या तिरोडा गोंदिया मार्गावर अदानी पावर प्लांट च्या गेट क्रमांक १ जवळ मोटारसायकलने जाणाऱ्या व्यक्तीचा रक्त वाहतूक करणाऱ्या गाडीने धडक दिल्याने एकाचा जागीच मृत्यू झाला आहे. तर एक जखमी झालेला आहे. आज जागतिक रक्त दान दिवस असून नागपूर येथिल हेडगेवार रक्त पेढी या चारचाकी गाडीने गोंदिया इथून रक्त संकलन करत नागपुरला परत जात असताना. तिरोडा येथिल अदानी पॉवर प्लांट च्या गेट क्रमांक १ जवळ मोटासायकलस्वार ला जबर धडक दिल्याने एकाचा जागीच मृत्यू झाला आहे. मृतकांचे नाव गणेश साठवणे, ४५ वर्ष व जखमी संतोष साठवणे २८ वर्ष राहणार खुर्शिपार असे आहे. या अपघातामुळे रस्त्यावर काहीकाळ वाहतूक खोळंबली होती. अपघाताची माहिती तिरोडा पोलिसांना दिली असता पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा करत गुन्हा दाखल करून पुढली तपास तिरोडा पोलीस करत आहे.