कन्हान : – अण्णा मोड डुमरी येथुन गोंडेगाव खुली कोळसा खदान ला कोळसा भरण्याकरिता जाणा-या ट्रकने पोलट्री फार्म कडे जाणा-या दोन पायदळी व्यकतीने जोरदार धडक मारल्याने रंजित डेहरिया चा घटनास्थळीच मुत्यु झाला तर रोहीत डेहरिया जख्मी झाला.
बुधवार (दि.१८) ला सायंकाळी ७ वाजता दरम्यान अणा मोड डुमरी वरून सामान घेऊन पायदळ येत असताना नांदगाव पोलट्री फाम जवळ डुमरी कडुन गोंडेगाव खुली कोळसा खदान ला कोळसा भरण्या करिता जाणा-या ट्रकने रोहीत केसरी डेहरिया वय २८ वर्ष व रंजित रामनारायण डेहरिया वय २२ वर्ष राह. सिमरिया जि सिवनी (म प्र) हल्ली मु नांदगाव पोलट्री फार्म हयाना मागुन जोरदार धडक मारल्याने रोहीत डेहरिया बाजुला फेकल्या गेला तर रंजित रामनारायण डेहरिया ट्रकट्या चक्यात आल्याने घटनास्थळी त्याचा मुत्यु झाला. तर रोहीत डेहरिया जख्मी झाला. ग्रामस्थानी कोळसाचे ट्रक काही वेळ थांबवुन वेकोलि गोंडेगाव खदान प्रशासनाने आरोपी ट्रक चालकास पकडुन मुतकास नुकसान भरपाई देऊन बेधुंद चालण्यावर प्रतिबंध लावण्याची मागणी करण्यात आली. घटस्थळी कन्हान पोलीस पोहचुन मुतदेह उपजिल्हा रूग्णालयात शवविच्छेदना करिता पाठवुन पुढील तपास करित आहे.
कोळसा ट्रक ने पायदळी दोन इसमाना धडक मारल्याने एक मुत्यु तर एक जख्मी
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com