संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी ता प्र 22:-मागील चार वर्षांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीमुळे निर्माण झालेंला अतिवृष्टीचा फटका मिळत प्रशासनाची तारांबळ न होता नागरिकांचा जीव मुठीत न यावा यासाठी नियोजित पद्धतीने खबरदारी घेण्याच्या पूर्वयोजना म्हणून कामठी तहसील कार्यालय च्या तालुका शोध व बचाव पथकास आपत्ती प्रतिसाद दल (एसडीआरएफ) मार्फत आज 22 मे ला सोनेगाव राजा येथे कन्हान नदीवर तहसीलदार गणेश जगदाडे यांच्या मार्गदर्शनार्थ मान्सूनपूर्व आपत्ती व्यवस्थापणाचे एक दिवसीय प्रशिक्षण देण्यात आले.
मागील चार वर्षांपूर्वी पावसाळ्यात कामठी तालुक्यात सुरू असलेल्या संततधार पावसाने पावसाची सरासरी ओलांडली होती.तसेच सर्वत्र सुरू असलेल्या संततधार पावसामुळे पेंच प्रकल्पातील पाण्याचा वेढा वाढल्याने नाईलाजास्तव पेंचचे सोळा दरवाजे उघडण्यात आले होते.परिणामी हा जलाशय कन्हान नदीत विसर्ग झाल्याने कन्हान नदी फुगल्याने या नदी काठावरील कामठी तालुक्यातील कन्हान नदी काठावरील बिडबिना व सोनेगाव राजा गावाला पुराणे वेढले होते.तसेच दोन्ही गावांना बेटाचे स्वरूप प्राप्त झाले होते.सोनेगाव राजा येथे 350 तर बिडबिना येथील 36 नागरिक पुरात अडकले होते .याप्रसंगी तत्कालीन एसडिओ श्याम मदनूरकर व तत्कालीन तहसीलदार अरविंद हिंगे यांनी तालुका प्रशासनाच्या वतीने त्वरित दखल घेत जिल्हा नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन पथकाच्या रेस्क्यू ने बोटी ने सुरक्षित बाहेर काढण्यात यश गाठले होते.तर अशी परिस्थिती मागील सन 1994 मध्ये झालेल्या पावसाची पुनरावृत्ती झाल्याचे सांगण्यात येत होते.
तेव्हा अशा नैसर्गिक आपत्तीचा फटका लागत यासारखी अतिवृष्टीची पुनरावृत्ती न व्हावी व प्रशासनाची एकच तारांबळ न होता नागरिकांचा जीव मुठीत न यावा यासाठी शासनाकडून नागपूर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणास प्राप्त झालेल्या रबरी बोटीचा उपयोग कामठी तालुका शोध व बचाव पथकास ऐन वेळी नागरिकांचा जीव वाचविण्यासाठी कसा उपयोग करता येईल यासाठी कामठी तालुका आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण चे अध्यक्ष व तहसीलदार गणेश जगदाडे यांच्या मार्गदर्शनार्थ आज 22 मे ला सकाळी 10 वाजता सोनेगाव राजा येथे कन्हान नदीवर राज्य आपत्ती प्रतिसाद दल नागपूरचे समादेशक तथा नियंत्रण अधिकारी डॉ प्रियंका नारनवरे, व सहाय्यक समादेशक कृष्णा सोनटक्के यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली टीम क्र 2 चे पोलीस निरीक्षक गुरुदेव खोब्रागडे,पोलीस उपनिरीक्षक आय रुंदई यांच्या नेतृत्वात 10 रेस्कुवर कन्हान नदी काठावरील सोनेगाव राजा नदी पात्रावर इम्प्रेवाइज डिव्हाईस व स्टॅंडर्ड डिव्हाईस अशा विविध आपत्ती व्यवस्थापन विषयक माहिती दिली. ओबीएम व आय आर बी बोट यांचे प्रशिक्षण देण्यात आले तसेच कामठी तहसीलमधील उपलब्ध आपत्ती निवारण साहित्याची तपासणी केली.
याप्रसंगी तालुका शोध व बचाव पथकातील तहसिलदार गणेश जगदाडे, नायब तहसीलदार राजीव बमनोटे,नायब तहसीलदार पी आर साधनकर, मंडळ अधिकारी महेंद्र कांबळे,, कोतवाल कुंजीलाल पानतावणे आदींना रबरीच्या बोटीवर बसवून नदीत प्रशिक्षण देण्यात आले.याप्रसंगी आपत्ती प्रतिसाद दल पथक(एसडीआरएफ),कामठी तालुका आपत्ती व्यवस्थापन पथक, तलाठी, मंडळ अधिकारी ,सोनेगाव चे पोलीस पाटील,सरपंच, ग्रामसेवक, फायर ब्रिगेड चे कर्मचारी,पोलीस वर्ग आदी उपस्थित होते.