अरोली :- तारसा – चाचेर जि.प .अंतर्गत येत असलेल्या भेंडाळा येथे ओम स्टार क्रीडा मंडळ द्वारा एक दिवसीय कबड्डी स्पर्धेचे आज दिनांक 24 डिसेंबर मंगळवारला सायंकाळी पाच वाजता आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत 60 केजी वजन गट ची अट ठेवण्यात आलेली आहे. स्पर्धेकरिता गावातील, परिसरातील व तालुक्यातील राजकीय व सामाजिक कार्यकर्त्यांकडून प्रथम पुरस्कार 15000 ,द्वितीय पुरस्कार दहा हजार, तृतीय पुरस्कार 5000, चतुर्थ पुरस्कार 3000 अशा चार पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे.
कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून सामाजिक कार्यकर्ते श्यामसुंदर वेलगापुडी, तर अध्यक्ष म्हणून जि. प .सदस्य कैलास बरबटे राहणार आहे. कार्यक्रमाला गावातील परिसरातील व तालुक्यातील ,सामाजिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवर मंडळी उपस्थित राहणार असून या कार्यक्रमाच्या लाभ घेण्याचे आव्हान आयोजक समितीचे दिनेश यादव, रोहित वाघाडे ,अमन वाघाडे ,रुपेश वाघाडे, विशाल भोयर, बादल जुगनायके ,अभिषेक कापसे, गौरव मेश्राम ,अर्पित बरबटे ,दक्ष माटे, सोहम बिघाने ,नैतिक वरठी, आयुष उईके, सुजित उईके, दीपक बांगडकर ,आदित्य नरोले, ओम महादुले यांनी केले आहे व ते सर्व या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेत आहे.