संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
• कामठी मेट्रो स्टेशन, न्यु कामठी कडे जाणारा अंडरपास ब्रिज व ईतर अंतर्गत रस्ते इत्यादी विषयावर होणार निर्णय.
कामठी ता प्र 5:- आज पाच जानेवारी 2023 ला माजी राज्यमंत्री अँड. सुलेखा कुंभारे यांनी कामठी शहरातील विविध विकास कामाच्या संदर्भात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना निवेदन सादर केले होते. त्यामध्ये प्रामुख्याने मेट्रो -2 प्रकल्पामध्ये कामठी शहराचा समावेश करण्यात आला आहे. व केंद्रीय मंत्री मंडळाने सुध्दा मंजूरी दिली आहे. त्या अनुसार ऑटोमोटिव चौक नागपूर पासुन ड्रॅगन पॅलेस टेम्पल पर्यंत मेट्रो चे काम त्वरित सुरू करावे अशी विनंती केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांना करण्यात आली होती. तसेच न्यु कामठी येथील रहवासी लोकसंख्या वाढली असल्यामुळे व ड्रॅगन पॅलेस टेम्पल ला भेट देणा-या पर्यटकांच्या संख्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्यामुळे अतिरिक्त अंडरपास ब्रिज बांधण्याची विनंती सुध्दा करण्यात आली होती.
बैठकीच्या पार्श्वभुमीवर लोककर्म विभागाचे मुख्य अभियंता . दहपुते व वरिष्ट अधिकारी यांनी काल बुधवार 4 जानेवारीला कामठी येथे भेट देवून जागेची पाहणी केली. भेटी दरम्यान प्रस्तावित ड्रॅगन पॅलेस मेट्रो स्टेशन व नवीन कामठीला जोडणा-या अंडरपास ब्रिजच्या संदर्भात अधिका-यांनी अँड. सुलेखा कुंभारे यांच्या सोबत प्राथमिक चर्चा केली.
केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांच्या निवासस्थानी शुक्रवार सहा जानेवारीला सायंकाळी 4 वाजता आयोजित बैठकीला महामेट्रो चे संचालक ब्रिजेश दिक्षीत, सेंट्रल रेल्वेच्या डीआरएम रूचा खरे, नैशनलहाइवे चे आस्ती, कामठी विधान सभेचे आमदार टेकचंद सावरकर,पिडब्लूडी चे मुख्य अभियंता दहपुते इत्यादींना सुध्दा या बैठकीमध्ये उपस्थित राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.