नागपूर :- “जागतिक महिला दिन” च्या अनुषंगाने मा. पोलीस आयुक्त नागपूर यांनी आज दि. 08/3/2024 चे सायं. 7.30 वा. पोलीस स्टेशन इमामवाडा हद्दीमध्ये पोलीस उपायुक्त परिमंडळ क्र 4, सहाय्यक पोलीस आयुक्त, सक्करदरा विभाग, तसेच इमामवाडा पोलीस स्टेशनचे ठाणेदार यांच्यासह स्वतः इमामवाडा पोलीस स्टेशन अंतर्गत येणारे जाटतरोडी इंदिरानगर, रामबाग येथील झोपडपट्टी वस्तीमध्ये वाल्मिकी समाज भवन कुंदनलाल गुप्ता मैदान, भूरे मैदान , जयंती मैदान, जाटतरोडी येथे पोलीस अधिकारी व पोलीस अमलदारासह पायदळ पेट्रोलिंग करून , वस्ती मधील मैदानावर नागरिकांची प्रत्यक्ष भेट घेतली.
वस्तीमधील ज्येष्ठ नागरिक , महिला, युवा विद्यार्थी यांचेशी सुसंवाद साधून त्यांना वस्तीमध्ये समाजकंटकांकडून होणाऱ्या त्रासाबाबत , अवैद्य धंदे इत्यादी समस्या जाणून घेतल्यात. पोलीस आयुक्त यांनी संवादादरम्यान ” वस्तीतील नागरिकांच्या मनात समाजविघातक समाजकंटकापासून त्यांना असणारी भीती काढून टाकावी व त्यांच्या विरुद्ध काही तक्रार असेल तर संबंधित ठाणेदार अथवा आम्हास मनमोकळेपणाने सांगावे” याप्रमाणे प्रत्यक्ष संवाद करून नागरिकांच्या मनामध्ये विश्वास निर्माण केला .
नागरिकांनी देखील पोलीस आयुक्त यांच्याशी दिलखुलास संवाद साधून व त्यांच्या अडीअडचणी व त्यांना उद्भवणाऱ्या समस्या सांगितल्या. पोलीस आयुक्त यांनी वस्तीतील विद्यार्थी यांच्याशी वार्तालाप करून त्यांच्याशी शिक्षणाप्रती असलेले ध्येय याबाबत आस्थेने विचारपूस करून तेथील वस्ती मधील शिकणारे युवा वर्गाच्या मनात सकारात्मक दृष्टिकोन ठेवून त्यांना मार्गदर्शन केले. समाज भवन येथील रूमची पाहणी करून समाज भवन येथील वाचनालय सुरू करण्याबाबत सूचना दिल्या.