देशाच्या अमृत महोत्सव निमित्त ड्रॅगन पॅलेस येथे तिरंगा मार्च चे आयोजन..

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

– दादासाहेब कुंभारे प्रशिक्षण केंद्रात होतेय 75 मीटर लांबीच्या तिरंगा झेंड्याची निर्मिती

-ओगावा सोसायटीचा अभिनव उपक्रम 

कामठी ता प्र 13 :- देशाच्या स्वतंत्रता दिवसाच्या अमृत महोत्सव निमित्त ओगावा सोसायटी द्वारे विश्वविख्यात ड्रॅगन पॅलेस टेम्पल येथे ‘तिरंगा मार्च’चे आयोजन करण्यात आले आहे.75 व्या स्वातंत्र्य दिवसानिमित्त ड्रॅगन पॅलेस टेम्पल येथे 75 मीटर लांबीचा ‘तिरंगा झेंडा मार्च’ काढण्याचा अभिनव उपक्रम करण्याचे ओगावा सोसायटीच्या अध्यक्षा व ड्रॅगन पॅलेस टेम्पल च्या प्रमुख ऍड सुलेखाताई कुंभारे यांनी जाहीर केले आहे.

75 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त 75 मीटर लांब असलेल्या तिरंगा झेंड्याची निर्मिती ड्रॅगन पॅलेस टेम्पल परिसरात असलेल्या दादासाहेब कुंभारे बहुउद्देशीय प्रशिक्षण केंद्रातील प्रशिक्षार्थी विद्यार्थ्यातर्फे करण्यात येत आहे.उल्लेखनीय आहे की कोरोनाच्या प्रादुर्भाव दरम्यान दासासाहेब कुंभारे प्रशिक्षण केंद्र येथे महिलांना स्वयंरोजगार देऊन एक लाख मास्क तयार करून निशुल्क वाटप करण्याचे उपक्रम ओगावा सोसायटीतर्फे घेण्यात आला होता.

13 ते 15 ऑगस्ट दरम्यान विश्वविख्यात ड्रॅगन पॅलेस कॅम्पस येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.त्यामध्ये प्रामुख्याने राष्ट्रीय गायन स्पर्धा, वृक्षारोपण, आरोग्य शिबिर तसेच सांस्कृतिक कार्यक्रमाचा समावेश आहे.हरदास विद्यालय व ड्रॅगन इंटरनॅशनल स्कुल येथे विद्यार्थ्यांकरिता विविध शैक्षणिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

रविवार दिनांक 14 ऑगस्ट 2022 ला सकाळी 9 वाजता विश्वविख्यात ड्रॅगन पॅलेस टेम्पल येथुन 75 मीटर लांबीच्या तिरंगा झेंड्यासह ‘तिरंगा मार्च’ चा शुभारंभ करण्यात येईल.या तिरंगा मार्च ला ड्रॅगन इंटरनॅशनल स्कुल, हरदास विद्यालय व दादासाहेब कुंभारे बहुउउद्देशीय प्रशिक्षण केंद्रातील विद्यार्थ्याद्वारे या 75 मीटर लांबीचा तिरंगा झेंडा घेऊन फ्लॅग मार्च करण्यात येईल.या मार्च मध्ये ड्रॅगन पॅलेस टेम्पल चे धम्मसेवक, धम्मसेविका , ओगावा सोसायटी, हरदास शैक्षणिक व सांस्कृतिक संस्था, दादासाहेब कुंभारे बहुउद्देशीय प्रशिक्षण केंद्र , डॉ बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक व संशोधन केंद्र , ड्रॅगन पॅलेस विपश्यना मेडिटेशन सेंटर , ओगावा इंटरप्रायजेस आदी संस्थेतील पदाधिकाऱ्यांचा सहभाग राहणार आहे.या तिरंगा झेंडा मार्च चा समारोप ड्रॅगन पॅलेस टेम्पल परिसरातील डॉ बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक व संशोधन केंद्रात होणार आहे.

सोमवार दिनांक 15 ऑगस्ट रोजी स्वतंत्र दिनानिमित्त दरवर्षी प्रमाणे सकाळी 8.30 वाजता ड्रॅगन पॅलेस टेम्पल परिसरात असलेल्या डॉ बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक व संशोधन केंद्र येथे ओगावा सोसायटीच्या अध्यक्षा व ड्रॅगन पॅलेस टेम्पल च्या प्रमुख ऍड सुलेखाताई कुंभारे यांच्या शुभ हस्ते ध्वजारोहण करण्यात येईल.याप्रसंगी ड्रॅगन इंटरनॅशनल स्कुलच्या विद्यार्थ्याद्वारे विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात येतील.

75 व्या स्वातंत्र्य अमृत महोत्सव निमित्त ड्रॅगन पॅलेस टेम्पल परिसरात शेकडो तिरंगी झेंडे लावण्यात आले असून संपूर्ण परिसर हा देशभक्तीने न्हाहून निघालेला आहे.विश्वविख्यात ड्रॅगन पॅलेस टेम्पल, डॉ बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक व संशोधन केंद्र, ड्रॅगन पॅलेस विपश्यना मेडिटेशन विपश्यना सेंटर येथे मोठ्या प्रमाणात विद्दुत रोषणाईने सजावट करण्यात आली आहे. दरवर्षी स्वातंत्र्य दिनानिमित्त हजारोच्या संख्येने नागरिक ड्रॅगन पॅलेस टेम्पल ला भेट देत असतात.त्यामुळे अमृत महोत्सव निमित्त केलेली रोषणाई ही आकर्षणाचे केंद्र होणार आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

सिटी हॉस्पिटलवरील रोषणाईतून देशभक्तीचे दर्शन..

Sat Aug 13 , 2022
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी ता प्र 13 :- स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त कामठी -रणाळा मार्गावर असलेल्या सिटी हॉस्पिटलवर करण्यात आलेली रोषणाई संपूर्ण कामठी शहरवासी, रणाळा, येरखेडा वासीयांचे लक्ष वेधून घेतले आहे.सिटी हॉस्पिटलच्या इमारतीवर साकारण्यात आलेल्या स्पॉट लाईट च्या प्रतिकृतींतुन सिटी हॉस्पिटल ने राष्ट्रभक्तीचे अनोखे दर्शन घडविले आहे.या राष्ट्रभक्तीचे अनोखे दर्शन घडविण्यासाठी सिटी हॉस्पिटल चे डॉ तंजीम आजमी,डॉ उमेझा आजमी,डॉ […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com