संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
मैत्र्य सख्यांचे महिलांसाठी आनंदोत्सव
कामठी ता प्र 22 :- मैत्र्य सख्यांचे भव्य महिला मेळावा महिलांच्या आनंदपूर्ती साठीच प्रा.अवंतिकाताई रमेश लेकुरवाळे सभापती महिला बाल कल्याण समिती जि.प. नागपुर यांच्या द्वारा प्रत्येक वर्षी संसारासाठी सतत झटत राहणाऱ्या सर्व महिलांसाठी, त्यांच्या खास मनोरंजनासाठी, त्यांना त्यांच्या हक्काचा मंच मिळवून देण्यासाठी, काही क्षणासाठी सर्व जबाबदारी विसरून मंत्रमुग्ध होऊन त्यांनी आनंदोत्सव साजरा करावा म्हणून मागील ११ वर्षापासून या महिला मेळाव्याचे सातत्यपूर्ण आयोजन करण्यात येते. त्या प्रमाणेच आज रविवार दिं.२२ जानेवारी २०२३ ला तरोडी (बु) च्या प्रांगणामध्ये मैत्र्य सख्यांचे महिला मेळावा २०२३ चे भव्य आयोजन करण्यात आले.
प्रसंगी या कार्यक्रमाच्या उद्घाटिका सौ.अनुजाताई सुनीलजी केदार (अध्यक्षा सहकारी सूतगिरणी पाटणसावंगी), कार्यक्रमाच्या अध्यक्षा सौ.संध्याताई सव्वालाखे ( प्रदेशाध्यक्षा भा.रा.काँ.पा. महा.राज्य नागपूर), कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी सौ.मुक्ताताई कोक्कडे अध्यक्षा जि.प.नागपूर, .कुंदाताई राऊत उपाध्यक्ष जि.प. नागपूर, सौ.अनुराधाताई भोयर (संचालिका स्वामी अवधेशानंद पब्लिक स्कूल), सौ. राधाताई अग्रवाल सदस्य जि.प. नागपुर, राणी यशोधराजी भोसले, लायन मंगला कुमार, पराल भाभी नवीन पटेल, लायन डॉ. किरण महतो तसेच कार्यक्रमाचे परीक्षक सौ. प्रांजलताई वाघ माजी सरपंच कढोली, सौ. वैशालीताई कुबडे, सौ. मनीषाताई लाखुरकर, सौ. चंचलताई गायधने आणि इतर सर्व सन्माननीय मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शुभप्रसंगी सत्कार कर्तुत्वांचा यामध्ये सौ. तक्षशिलाताई वाघधरे महासचिव प्र.काँ.कमिटी, तसेच डान्स कर्नाटीका डान्स सीजन ६ मध्ये प्रथम क्रमांक पटकावनारी चाहत शेख शाहीर वय १३ वर्ष यांचाही सत्कार करण्यात आला.
महिलांच्या मनोरंजनासाठी व त्यांच्यामधील सुप्त कलागुणांना वाव मिळावा म्हणून मैदानी स्पर्धा (रस्सीखेच, दोरीवरच्या उड्या, फुगडी, संगीत खुर्ची, पोतेदौड, साथी दौड, मटकी फोड, चेंडू टप्पे) मंचावरील विविध मनोरंजनात्मक स्पर्धा (नृत्य स्पर्धा, फॅन्सी ड्रेस, उखाणे स्पर्धा, फुगे फोडा आणि वाचवा, वन मिनिट शो) ई. स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
तसेच या महिला मेळावा मध्ये महिलांची वैद्यकीय आरोग्य तपासणी शिबिर देखील उपलबध होते. ज्या मध्ये (कॅन्सर तपासणी मॅमोग्राफी व मूर्ख कर्करोग, स्त्री रोग तपासणी गर्भपिशवी कॅन्सर तपासणी, बी.पी. आणि सुगर तपासणी, सर्वसाधारण आरोग्य तपासणी, ई.सी.जी. ) ई.या महिला मेळाव्या मध्ये ग्रामीण भागातील ५० गावातील ६ हजाराहून अधिक महिलांनी सहभागी होऊन उत्कृष्ट प्रतिसाद दिला. मेळाव्याचे आयोजन केल्याबद्दल प्रा.अवंतिकाताई रमेश लेकुरवाळे यांचे सर्व महिलांनी विशेष आभार व्यक्त केले. कार्यक्रमाचे आयोजनाला श्री. गजानन सेवा संस्थेच्या कार्याध्यक्ष सौ. रश्मीताई तलमले, सचिव सौ. नंदाताई ठाकरे, कोषाध्यक्ष सौ. स्नेहा मिश्रा, संघटक सौ.नीलम सिंह, सदस्या सौ. सरोज गोल्हर, सदस्य सौ. विद्या पाठराबे यांनी विशेष सहभाग दिला.
सौ.संध्याताई सव्वालाखे यांनी या भव्य महिला मेळाव्याचे कौतुक केले आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. तसेच प्रा.अवंतिकाताई रमेश लेकुरवाळे यांनी कार्यक्रमाचे संचालन करतांना महिलांना जश्या आहात तशाच स्वतः साठी कधीतरी जगायला शिका, महिला म्हणून स्वतःच अस्तित्व स्वतःच शोधायला शिका आणि जिथे आहात तिथे समाजासाठी जगायला शिका, स्वतःच अर्थ आचरण करायला शिका असे आव्हान केले.