संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- कामठी तालुक्यांतर्गत येणाऱ्या धारगाव येथील आकाश चौधरी यांच्या घरी काल सायंकाळी 5 दरम्यान नागपंचमीच्या पूर्वदिनी 4 फूट लांबीचा नाग आढळल्याची घटना घडल्याची माहिती कामठीचे सर्पमित्र बोरकर बंधू यांना कळताच यांनी त्वरित घटनास्थळ गाठून सदर सापाला ताब्यात घेत त्यास अधिवासात सोडून सापाला जीवनदान दिल्याची मोलाची कामगिरी केली.
ही यशस्वी कारवाही वाईल्ड लाईफ वेल्फेअर सोसायटी कामठी चे सर्पमित्र प्रशांत बोरकर व अनिल बोरकर यांनी केली.