गोविंदराव वंजारी फाऊंडेशनच्या वतीने पदवीधर बेरोजगारांना नोकरी मिळण्याकरिता दि. 10 ऑगष्ट 2023 रोजी जॉब कार्ड वितरण तसेच शासकीय नोकरीकरिता उपयुक्त अभ्यासिकेचे विमोचन

नागपूर :- गुरुवार दि. 10 ऑगष्ट 2023 रोजी नागपूर विभागांतर्गत सर्व जिल्हयातील वेगवेगळ्या शाखेतील पदवीधर युवकांसाठी गोविंदराव वंजारी फाऊंडेशनच्या वतीने जॉब कार्ड वितरणाचा कार्यक्रम होऊ घातला आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष आ. नानाभाऊ पटोले यांच्या शुभहस्ते होणार असून मुख्य अतिथी म्हणून नागपूर शहर काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष  आमदार विकास ठाकरे, नागपुरचे जिल्हाधिकारी डॉ. नितीन इटनकर तसेच पोलीस आयुक्त अमितेशकुमार याप्रसंगी उपस्थित राहणार आहेत.

स्व. आमदार गोविंदरावजी वंजारी यांच्या स्मृतीदिनानिमित्त आयोजित या कार्यक्रमाची संकल्पना नागपूर विभाग पदवीधर मतदार संघाचे आमदार अॅड. अभिजित गो. वंजारी यांची आहे. तसेच याप्रसंगी देशातील सर्व प्रकारच्या युपीएससी, एमपीएससी, बँकीग, रेल्वे, सहकार क्षेत्र, तत्सम प्रकारच्या स्पर्धा परीक्षांची अचूक व महत्वपूर्ण माहिती असणार्या अभ्यासिकेचे विमोचन सुध्दा याप्रसंगी होणार आहे. गोविंदराव वंजारी फाऊंडेशन व पुण्यातील जॉब फेअर इंडियाच्या संयुक्त विद्यमाने जॉब कार्ड वितरणाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. यामध्ये राज्यातील व देशातील अनेक बहुराष्ट्रीय कंपन्यांमधील नोकरीची संधी बेरोजगार पदवीधरांना उपलब्ध होणार असून यामध्ये सर्व प्रकारचे पदवीधर त्यामध्ये इंजिनिअरिंग, फार्मसी, लॉ, बी.ए., बी.कॉम., बी.एससी. बीबीए, बीसीसीए, बीसीएस तसेच अनेक प्रकारच्या पदवीधरांचा समावेश करण्यात आलेला आहे. या जॉब कार्डच्या माध्यमातून कार्ड अॅक्टीवेट झाल्यानंतर त्या पदवीधर युवकाला वर्षाच्या 365 दिवसापैकी किमान दोनशेपेक्षा अधिक दिवस दररोज एसएमएसद्वारे वेगवेगळ्या कंपनीतील नोकरीची माहितीची उपलब्धता होणार असून या माध्यमातून होतकरू अशा पदवीधर युवकाना योग्य ठिकाणी सुवर्णसंधी प्राप्त होणार आहे. आतापर्यंत या जॉब कार्डकरिता 10000 पेक्षा अधिक युवक-युवतींनी Abhijitwanjarri.jobfairindia.in या लिंकवर रजिस्ट्रेशन केलेले आहे. तसेच अजूनही या लिंकद्वारे विद्यार्थ्यांना या सुवर्णसंधीमध्ये सहभाग घेता येईल.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

नागपूरात पहिल्यांदाच होणार राज्यस्तरीय महायोगोत्सव संमेलन ऑक्टोबर ला

Tue Aug 8 , 2023
– २०२३ च्या महायोगोत्सव संमेलनात राज्यातील योगशिक्षकांचा सहभाग.  नागपूर :-  योगा फाउंडेशन, महाराष्ट्र संचालित महाराष्ट्र राज्य योगशिक्षक संघ आयोजित बहुप्रतीक्षेत असलेले दुसरे राज्यस्तरीय योगशिक्षक संमेलन ‘महायोगोत्सव २०२३’ चे नागपूर येथे होणार असल्याचे आवाहन राज्य संघटनेचे संस्थापक तथा अध्यक्ष डाॕ मनोज निलपवार यांनी केले. नाशिक येथे १० व ११ डिसेंबरला पहिले संमेलन नुकतेच पार पडले. तर नागपूर येथे होऊ घातलेले २०२३ […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com