प्रशासनाचे खबरदारी आदेश जारी
प्रशासन 100 टक्के लसीकरणासाठी कटीबद्ध
लसीकरण एकमेव उपाय
त्रिसूत्रीचा अवलंब अनिवार्य
नागपूर – दक्षिण आफ्रिकेमध्ये ‘ओमिक्रॉन’ हा कोविड विषाणूचा नवीन प्रकार आढळून आला आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र व राज्य शासनाकडून प्राप्त दिशानिर्देशांची काटेकोर अंमलबजावणी करण्यासोबतच मास्कचा वापर, सॅनिटायझर व सुरक्षित अंतर ठेवणे या त्रिसुत्रीचा अवलंब करणे अत्यंत गरजेचे आहे. शासन लसीकरण व अन्य बाबींवर काटेकोर अंमलबजावणी करीत आहे. स्वत:चा जीव बहूमुल्य आहे, याची गंभींरतेने जाण ठेवून नागरिकांनी स्वंयंप्रेरेणे लसीकरण करुन त्रिसूत्रीचा अवलंब करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी विमला आर. यांनी केले. यासंदर्भात त्यांनी आज निर्देश जारी केले आहेत.
कोविडच्या ओमिक्रान या नवीन विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी सर्वांनी खबरदारी घेणे अत्यंत गरजेचे असून कोविड अनुरुप वर्तनाचे काटेकोरपणे पालन अनिवार्य आहे. शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या नियमावलीची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी. तसेच संभाव्य तिसरी लाट विचारात घेवून शासन त्यासाठी उपाय योजना करीत आहे. परंतु, शासकीय उपयायोजनेवर अवलंबून न राहता स्व: पुढाकार घेवून सार्वजनिक ठिकाणी गर्दी करु नये, मोठमोठया कार्यक्रमाचे आयोजन करु नये. महामारीच्या लढ्यात शासनास सहकार्य करा, असे त्यांनी सांगितले.
कोविड लसीकरण मोहिमेत शहरासह संपूर्ण जिल्ह्यात कोविड प्रतिबंधक लसीची पहिली आणि दुसरी मात्रा घेतलेल्यांची संख्या 50 लाख 2 हजार पर्यंत पोहचली आहे. पहिली मात्रा घेणाऱ्यांचे प्रमाण 88 टक्के झाले असून नागपूर शहरात 92.64 टक्के तर ग्रामीण भागात 82.44 टक्के नागरिकांचा यामध्ये समावेश आहे.
हर घर दस्तक या अभियानामध्ये पहिली मात्रा घेतलेल्या व दुसऱ्या मात्रेसाठी पात्र असलेल्या व्यक्तींचा शोध घेऊन लसीकरण करण्यात येत आहे. यासोबतच स्वयंसेवी संस्थाच्या माध्यमातून लसीकरण सुरु असून रात्रौ 9 वाजेपर्यंत मोहिम राबविण्यात येत आहे. 30 नोव्हेंबरपर्यंत शंभरटक्के लसीकरणाचे उद्दिष्ट गाठण्यासाठी यंत्रणा कामाला लागली असल्याची माहिती जिल्हाधिकारी यांनी दिली.
पहिल्या व दुसऱ्या कोविड लाटेच्या व्हेरियंटपेक्षा या विषाणूचा प्रसार फार झपाटयाने होत आहे. दुसऱ्या लाटेचा व्हेरियंटचा प्रसारासाठी 10 मीनीट लागत होते, ओमिक्रान विषाणूची लागण केवळ 5 मीनीटात होते. या भयावह विषाणूची लागण होऊ नये यासाठी प्रामुख्याने एकमेव उपाय म्हणजे लसीकरण असून पहिली लस व दुसरी लस नागरिकांनी तत्काळ घ्यावी. 50 लाखाच्यावर लसीकरण झाले असले तरीही नागरिकांनी पुढाकार घेवून स्वत: व कुटुबियांची लसीकरण जागरुकतेने करुन घेण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
जिल्ह्यात घरोघरी आशाताई, अंगणवाडी सेविका,ग्रामसेवक व तलाठी यांच्यामार्फत सर्वेक्षण करुन लाभार्थ्यांच्या लसीकरणासाठी जनजागृती करण्यात येत आहे व समुपदेशन करण्यात येत आहे, असेही त्यांनी सांगितले.
जास्तीत जास्त व्यक्तींचे कोविड लसीकरण झाले तर आरोग्य यंत्रणेवर येणारा ताण कमी होईल. त्यामुळे कोविडची लाट रोखण्यासाठी लसीकरणावर अधिक भर देणे गरजेचे आहे. प्रत्येक पात्र व्यक्तीला विहित कालावधीत दोन्ही लसीचा मात्रा अनिवार्य आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी यांनी दिली.
नवे आदेश जारी
जिल्हाधिकाऱ्यांनी कोविड संदर्भातील सद्यास्थिती लक्षात घेता नवे आदेश आज जारी केले आहेत. यामध्ये तिकीट असणाऱ्या किंवा नसणाऱ्या कार्यक्रमात लसीकरणाशिवाय सहभागी होता येणार नाही. मॉलपासून बाजारापर्यंत, सार्वजनिक प्रवासी यंत्रणेचा प्रवासी वापर, सर्व आस्थापनावरील भेटी, नागपूर जिल्ह्यात प्रवेश यासाठी संपूर्ण लसीकरण आवश्यक करण्यात आले आहे. चित्रपट, नाट्यगृह उपस्थिती क्षमतेच्या 50 टक्के अनुमती देण्यात आली आहे. 1 हजारापेक्षा गर्दीच्या कार्यक्रमासाठी माहिती प्रशासनाला देणे आवश्यक आहे. यासंदर्भात नियम न पाळणाऱ्यांना 500 ते 10 हजारापर्यंत दंड आकारण्यात आला आहे.
दिनेश दमाहे
9370868686