संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी ता प्र 24 :- स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या गादा गावातील एका वृद्ध इसमाने गावातील ठाकरे नामक शेतकऱ्याच्या शेतातील झोपडीत दोरीने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना आज दुपारी अडीच दरम्यान घडली असून मृतकाचे नाव पांडुरंग तुकाराम मांडवकर वय 85 वर्षे रा गादा कामठी असे आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सदर मृतक वृद्ध इसम हा हिंगणा तालुक्यातील गुंमगाव गावातील राहिवासी होता.काही कारणास्तव सदर इसम आपल्या मुलांशी दूर राहण्याची इच्छा व्यक्त करीत मागील 24 वर्षपासून गादा गावात राहत असलेल्या मुलगी व जावई कडे आश्रयाने राहत होता. आज अज्ञात कारणावरून सदर वृद्ध इसमाने गावातील ठाकरे नामक शेतकऱ्यांच्या शेतातील झोपडीत जाऊन दोरीने गळफास लावून आत्महत्या करीत जीवनाचा शेवटचा निरोप घेतला.
घटनेची माहिती मिळताच नवीन कामठी पोलिसांनी त्वरित घटनास्थळ गाठून घटनास्थळाचा पंचनामा करीत मृतदेह ताब्यात घेऊन पुढील उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह कामठीच्या शासकीय उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक श्याम वारंगे करीत आहेत.मृतकाच्या पाठीमागे दोन मुले, दोन मुली व नातवंड असा आप्तपरिवार आहे