मुंबई :- महात्मा जोतिबा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्रांचे अनावरण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज मंत्रालय येथे झाले. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह आमदार छगन भुजबळ, मुख्य सचिव मनु कुमार श्रीवास्तव, अपर मुख्य सचिव सुजाता सौनिक , चित्रकार राजेश सावंत, तसेच इतर मान्यवर, अधिकारी उपस्थित होते.
मंत्रालयातील मुख्य प्रवेशद्वाराच्या आतील बाजूस लावण्यात आलेल्या या भव्य तैलचित्रांचे अनावरण करून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी महात्मा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला अभिवादन केले. उपस्थित सर्वांनीही यावेळी पुष्प अर्पण करून अभिवादन केले.
महात्मा जोतिबा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्रांचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अनावरण
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com