संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी ता प्र 4 :- कामठी तालुक्यातील महादुला नगरपंचायतच्या प्रशासकीय इमारतीचा उद्घाटन सोहळा महादुल्यातील धम्म कुटी रोड येथे पार पडला. यावेळी प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत गरीब, वंचित नागरिकांना मालकी पट्टे वितरित करण्यात आले. नवीन प्रशासकीय इमारत महादुलावासींसाठी देखील उपयुक्त ठरेल व विकासाची साक्षीदार ठरेल, असा विश्वास असल्याचे मनोगत माजी पालकमंत्री आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केले.
यावेळी आमदार टेकचंद सावरकर, महादुला नगराध्यक्ष राजेश रंगारी, उपाध्यक्ष धनंजय भालेराव, मुख्याधिकारी ऋचा दाबडे, माजी जी प सदस्य अनिल निधान, सारिका झोड, मोहसीन शेख, सोनू कावळे, साविता वानखेडे यांच्यासह नगरसेवक, माजी नगरसेवक, नागरिक व नगर पंचायतचे कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते.