नागपूर :- नागरीकांच्या सेवेबाबत समाधान जाणून घेण्यासाठी, OCW चे कर्मचारी येत्या काही दिवसांत प्रत्येक ग्राहकाला भेट देऊन सर्वेक्षण करतील. या उपक्रमाचा उद्देश ग्राहक सेवा सुधारणे व सर्व रहिवाशांसाठी सेवा विश्वसनीय बनवणे आहे.
सर्व नागरिकांना विनंती आहे की त्यांनी कर्मचाऱ्यांची ओळख त्यांच्या अधिकृत ओळखपत्र तपासूनच सत्यापित करावी. कोणत्याही संशयास्पद हालचालीबाबत सावध राहा आणि आमच्या कॉल सेंटरला किंवा झोन कार्यालयाला त्वरित कळवा.
ही एक छोटीशी गैरसोय होऊ शकते, परंतु आपले सहकार्य आम्हाला अधिक चांगली सेवा देण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. सर्वेक्षण 31 मार्च 2025 रोजी संपणार आहे.
पाणीपुरवठ्यासंबंधित कोणत्याही तक्रारींसाठी ग्राहक NMC-OCW हेल्पलाइन 1800 266 9899 वर संपर्क साधू शकतात किंवा contact@ocwindia.com वर ईमेल पाठवू शकतात.