संदीप कांबळे, कामठी
कामठी ता प्र 17:- जातीधर्माच्या बंधनात न अडकता ओबीसींनी आपल्या हक्क आणि अधिकारासाठी एकजूट होणे गरजेचे आहे.ओबीसी जनगणना व्हावी यासाठी ओबीसी बांधवांनी जाती धर्माचा विचार न करता ओबीसींना संविधानिक हक्क मिळावे व त्यांना या देशाच्या संसाधनात समान वाटा मिळावा यासाठी ओबीसी जनगनणेची गरज आहे तेव्हा ओबीसीनो एकजूट व्हा असे मत महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज कामठी तालुक्यातील गादा येथे आयोजित राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे नागपूर जिल्हा अधिवेशन कार्यक्रमाच्या उदघाटन प्रसंगी व्यक्त केले . दरम्यान प्रमुख पाहुणे म्हणून व्यासपीठावर उपस्थित असलेले राज्याचे ओबीसी बहुजन कल्याण तथा मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडडेटीवार यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर हेच खरे ओबीसींचे उद्धारक असल्याचे मत व्यक्त करीत धर्माच्या नावावर ओबीसींनो विभाजित होऊ नका असे मत व्यक्त केले.
राष्ट्रीय ओबीसी महासंघ सातत्याने मागील सात वर्षांपासून ओबीसी समाजाच्या संविधानिक मागण्यासाठी संघर्षरत आहे .ओबीसी समाजाला जागृत करण्यासाठी राष्ट्रीय ओबीसी महासंघ देशभर अधिवेशने , धरणे आंदोलन तसेच इत्यादी संविधानिक मार्गाचा अवलंब करून ओबीसी समाजास आपल्या अधिकार , कर्तव्याची जाणीव करून देण्याचे व संविधानानुसार सोयी व सवलती ओबीसी समाजाला मिळायला पाहिजे परंतु त्या सवलती आज स्वातंत्र्याचे 75 वर्षे लोटूनही अजूनपावेतो मिळाले नाही त्या सोयी सवलती मिळायला पाहिजे यासाठी ओबीसी समाजास संघटित करून केंद्र व राज्य सरकारकडे सातत्याने ओबीसी समाजाच्या मागण्या मांडून त्या सोडविण्याच्या प्रयत्न करीत असते याच क्रमावर आधारित आज 17 एप्रिल ला राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे नागपूर शहर व ग्रामीण चे संयुक्त नागपूर जिल्हा अधिवेशन आयोजित करण्यात आले होते. हे संयुक्त अधिवेशन क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, शिक्षण महर्षी डॉ पंजाबराव देशमुख व भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना समर्पित करून आयोजित करण्यात आले.
ह्या अधिवेशनाचे उदघाटन कांग्रेस चे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांच्या हस्ते क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले , शिक्षण महर्षी डॉ पंजाबराव देशमुख, भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण व दीपप्रज्वलन करून करण्यात आले याप्रसंगी स्वागताध्यक्ष संघटनेचे प्रदेश महासचिव राजेश काकडे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून अधिवेशनाचे अध्यक्ष राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ बबनराव तायवाडे,राज्याचे ओबीसी बहुजन कल्याण तथा मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडडेटीवार, आमदार परिनय फुके, आमदार टेकचंद सावरकर, आमदार ऍड अभिजित वंजारी, माजी जी प अध्यक्ष सुरेशभाऊ भोयर,जी प सदस्य दिनेश ढोले,प्रसन्ना तिडके, शहाणे आदी ओबीसी महासंघाचे पदाधिकारी व कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते.
हे नागपूर जिल्हा संयुक्त अधिवेशन यशस्वीरित्या पार पडला असून अधिवेशनात मोठ्या संख्येत ओबीसी समाजबांधवांची उपस्थिती होती.
ओबीसींनो एकजूट व्हा:- नाना पटोले
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com