OBC  समाजाबद्दल टिका करणाऱ्या आघाडी सरकार मधील गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड विरुध्द आम आदमी पार्टी युवा आघाडी नागपूर तर्फे लाक्षणिक निदर्शन

नागपुर –  क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त आयोजित एका सार्वजनिक कार्यक्रमात गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी OBC समाजावर टिका केली.

या घटनेचा निषेध करत आज आम आदमी पार्टी युवा आघाडी विदर्भ संयोजक पियुष आकरे यांच्या नेतृत्वात संत जगनाडे चौक नागपूर येथे लाक्षणिक निदर्शन करण्यात आले, जितेंद्र आव्हाड यांनी केलेले वक्तव्य हे समस्त obc समाजाचा अपमान करणारे असून त्यांनी समस्त obc समाजाची माफी मागावी अन्यथा त्यांच्या विरोधात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.

मंडल आयोगाच्या आंदोलनात मोठ्या संख्येत OBC बांधवानी आपले बलिदान दिले… ओबीसी समाज हा सर्वांचा आदर करणारा समाज आहे, ओबीसी समाजाचे  राजकीय आरक्षण केंद्राकडून  काढून घेण्यात आले आहे यावर जितेंद्र आव्हाड आणि त्यांची आघाडी सरकार काही का करत नाही असा सवाल सुद्धा यावेळी आम आदमी पार्टी युवा आघाडी तर्फे करण्यात आला, जितेंद्र आव्हाड यांनी आजवर obc समाजातील विद्यार्थ्यांसाठी किती वसतिगृह बांधले, मंडल आयोगाच्या आंदोलनात त्यांची काय भूमिका होती असा सवाल यावेळी उपस्थिती करण्यात आला…

जितेंद्र आव्हाड यांनी समस्त ओबीसी समाजाची जाहीर माफी मागावी अशी मागणी आम आदमी पार्टी युवा आघाडी तर्फे करण्यात आली… यावेळी आप युवा आघाडी राज्य समिती सदस्य सौ. कृतल आकरे, प्रतीक बावनकर, कुणाल मंचलवार, हेमंत पांडे, पार्थ मिरे, ओम आरेकर, देवेंद्र समर्थ, अभय भोयर इत्यादी आप युवा आघाडी पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

News Today 24x7

Next Post

मेट्रो स्टेशनवर व्यावासायिक उपक्रमाकरीता मोठ्या प्रमाणात जागा उपल्बध

Wed Jan 5 , 2022
नागपूर, ०५ जानेवारी : महा मेट्रो नागपूर अंतर्गत कस्तुरचंद पार्क -सिताबर्डी इंटरचेंज-खापरी मेट्रो स्टेशन आणि सिताबर्डी इंटरचेंज ते लोकमान्य नगर मेट्रो स्टेशन दरम्यान २६.५ किमी मार्गिकेवर मेट्रो ट्रेनचे संचालन होत असून लवकरच १३.५ किमी मार्गिकेवर मेट्रो ट्रेनचे संचालन होणार आहे. यात सिताबर्डी इंटरचेंज ते प्रजापती नगर मेट्रो स्टेशन दरम्यान ८.५ किमी आणि कस्तुरचंद पार्क मेट्रो स्टेशन ते आटोमोटिव्ह चौक मेट्रो […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!