– बैठकीत शिष्यवृत्ती ,वस्तीगृह ,रोजगार, परदेशी शिष्यवृत्ती, ओबीसी विद्यार्थ्यांच्या समस्या व राजकीय आरक्षणाबाबत अंदोलन करण्याबाबत चर्चा
नागपूर :- नागपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटी ओबीसी विभाग तफें ओबीसी विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती,वस्तीगृह ,रोजगार ,परदेशी शिष्यवृत्ती ,ओबीसी विद्यार्थ्यांच्या समस्या संदर्भात गंभीर होऊन समस्यांना न्याय देण्याकरता तीव्र आंदोलनाचा ठराव बैठकीत संपन्न करण्यात आला.
नागपूर शहर ओबीसी विभागाचे अध्यक्ष राजेश कुंभलकर यांनी देवडिया काँग्रेस येथे सभा बोलण्यात आली सभेमध्ये शहर काँग्रेस कमिटीचे प्रधान महासचिव डॉ गजराज हटेवार ,माजी नगरसेवक एडवोकेट अशोक यावले , माजी नगरसेवक रमण पैगवार प्रा.दिनेश बाणाबाकोडे ,प्रदेश उपाध्यक्ष संजय भिलकर, प्रदेश महासचिव चंद्रकांत हिंगे, प्रदेश सचिव एडवोकेट सुयेंकांत जयस्वाल व प्रदेश महिला महासचिव विजया धोटे यांच्या प्रमुख उपस्थितीत ओबीसी कार्यकारिणीची बैठक संपन्न झाली. बैठकीमध्ये अद्याप पर्यंत विद्यार्थ्याचे शिष्यवृत्तीचे रक्कम प्राप्त न झाल्याने अनेक विद्यार्थ्यांनी ओबीसी विभागाकडे तक्रारी केलेले आहे या तक्रारीच्या संदर्भात जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन विद्यार्थ्यांना तात्काळ शिष्यवृत्ती मिळावी याकरिता आंदोलन उभे करण्यात येईल तसेच बेरोजगार युवकांना रोजगार मिळावा अनेक शासनाच्या जाहिरातीमध्ये ओबीसी टक्का कमी केल्याने तो वाढवून देण्यात यावा आणि ओबीसींना रोजगार प्राप्त करून दावा या संदर्भात शासनाचे लक्ष वेधण्याकरिता संविधान चौक येथे आंदोलन करण्यात आले. विद्यार्थ्यांना शैक्षणिक सवलती बरोबर वस्तीगृह ,परदेशी शिष्यवृत्ती ,राजकीय आरक्षण ओबीसी बांधवांना त्यांच्या हक्काचे असल्याने ते पूर्णपणे प्राप्त व्हावे याकरीता सुद्धा संघर्ष हा सातत्याने सुरू राहण्याचे बैठकीत निश्चित करण्यात आले. बैठकीमध्ये केशव धावडे विलास बारसकर , परमेश्वर राऊत, माहादेव गावंडे, कुमार मुरकुटे, प्रकाश लायसे,आदींनी ओबीसी बांधवांच्या समस्येच्या संदर्भात विचार व्यक्त केले कार्यक्रमाचे संचालन ओबीसी विभागाचे महासचिव मोरेश्वर भादे यांनी केले तर आभार प्रदर्शन संजय भिलकर यांनी मानले कार्यक्रमात सर्वश्री भूषण तल्हार ,प्रशांत पवार संतोष गोटाफोडे, आसिफ शेख,ललित कोरे,अरविंद क्षीरसागर,नरेंद्र लिल्लारे, प्रकाश बांते, प्रभाकर बागडे,रमेश राऊत,प्रकाश फुके,अतुल ढोबळे, राम बांदरे, कुंदे हरडे,रेहाना खान, रंजना कडूकर ,दामोदर धर्माळे, प्रदीप बोरले ,मनोज राणे ,राजू वडस्कर ,राजीव खेडकर,मच्छिंद्र साबळे ,ललित कोरे , गजानन देऊळकर ,संजय बाणाबाकोळे, महादेव डायने ,राजू मोहोळ , इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.